
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दहावीपर्यंत शिक्षण देणार्या शाळांची संख्या वाढवत आहेत. मुंबई मिररच्या एका वृत्तानुसार, पालिकेच्या दहावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळा कमी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पालिकेनं हा निर्णय घेतला आहे.
केवळ आठवीपर्यंत शिक्षण देणाऱ्या ५४३ शाळा आहेत. तर फक्त इयत्ता १० वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या २२४ शाळा आहेत. परिणामी, अनेक शिक्षणतज्ज्ञांनी असं मत व्यक्त केलं आहे की, “पालिकेनं दहावीपर्यंत शिकवणाऱ्या शाळांची संख्या वाढवणं हे विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.”
२२७ नगरसेवकांच्या जागा असलेली पालिका देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांपैकी एक आहे. आता तीन दशकांपासून पालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व आहे. शिवाय, नोव्हेंबर २०१९ मध्ये, मुंबईच्या महापौर निवडणुकीत शिवसेनेनं महापौर आणि उपमहापौर या दोन्ही निवडणुका जिंकल्या आणि त्या नागरी संस्थेवर नियंत्रण राखले आहे.
दुसरीकडे, भाजपचे आशिष शेलार यांनी शर्यतीतून माघार घेतल्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आणि सुहास वाडकर यांनी महापौर आणि उपमहापौरपदाचा कारभार सांभाळा. १९८५ पासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेनं नागरी मंडळावर नियंत्रण ठेवलं आहे. आत्तापर्यंत शिवसेनेकडे ८४ जागा, भाजपकडे ८२ जागा, राष्ट्रवादीचे ६ नगरसेवक आणि काँग्रेसचे ३० नगरसेवक आहेत.
हेही वाचा
