Advertisement

CBSE 10th Result 2022: CBSE 10वीचा निकाल आज नाही, जाणून घ्या नवीन तारीख

CBSE PRO रमा शर्मा यांनी याबाबतची माहिती दिलीये.

CBSE 10th Result 2022: CBSE 10वीचा निकाल आज नाही, जाणून घ्या नवीन तारीख
SHARES

आज सीबीएसई बोर्डाचा निकाल लागणार नाही हे स्पष्ट झालंय. CBSE PRO रमा शर्मा यांनी याबाबतची माहिती दिलीये. दहावी बोर्डाचा निकाल लागण्याआधी सांगितले जाईल असं रमा शर्मा यांनी नमूद केलंय.

CBSE PRO रमा शर्मा यांनी सांगितले, हा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट्स आणि सोशल मीडिया हॅन्डल्सवर जाहीर केला जाईल.

विद्यार्थी 13 जुलैपर्यंत इयत्ता 12वी आणि 15 जुलैपर्यंत 10वीच्या निकालाची अपेक्षा करू शकतात, तथापि, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. सीबीएसईने कधीही अधिकृतपणे तारखांची घोषणा करू शकते. 

केंद्रीय बोर्ड - CBSE आणि CISCE ने अद्याप निकाल जाहीर केलेला नसतानाही मुंबई विद्यापीठासह अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी त्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.

गेल्या काही वर्षांत सीबीएसईने 10वीच्या आधी 12वीचा निकाल जाहीर केला आहे. उदाहरणार्थ 2021 मध्ये, CBSE 12वीचा निकाल 30 जुलैला आणि CBSE 10वीचा निकाल 3 ऑगस्टला जाहीर झाला. 2020 मध्येही CBSE 12वीचा निकाल 13 जुलैला आणि 10वीचा निकाल 15 जुलैला लागला. सूत्रांनुसार यंदा बोर्डाचा निकाल १३ जुलैपर्यंत लागणार आहे.

निकाल लागल्यानंतर तुम्ही cbse.gov.in आणि results.gov.in या अधिकृत वेबसाइटवर 10वी बोर्डाचा निकाल पाहू शकता. याशिवाय डिजीलॉकर, एसएमएस आणि उमंग ॲपद्वारेही निकाल पाहता येणार आहे.

असा तपासा निकाल

  • विद्यार्थ्यांनी प्रथम सीबीएसई www.cbse.gov.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • यानंतर होम पेजवर दिलेल्या "सीबीएसई दहावी बारावी निकाल 2022" या लिंकवर क्लिक करा.
  • आता आपला रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • निकाल डाऊनलोड करा
  • त्याची प्रिंट काढून ती तुमच्याकडे ठेवा

CBSE 10 वी टर्म 2 ची परीक्षा 75 विषयांमध्ये घेण्यात आली. 12 वीच्या वर्गाची परीक्षा 114 विषयांमध्ये घेण्यात आली.

CBSE 10वी बोर्डाच्या निकालात विद्यार्थ्यांना एकूण गुण (टोटल मार्क्स), पात्रता स्थिती (क्वालिफायिंग स्टेटस)आणि इतर माहिती दिली जाईल. निकाल डाउनलोड केल्यानंतर, विद्यार्थी ही माहिती तपासू शकतात.



हेही वाचा

10वी आणि 12वी नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा