Advertisement

10वी आणि 12वी नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

अनुत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या पुनर्परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

10वी आणि 12वी नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
SHARES

अनुत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या पुनर्परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

दहावीची पुनर्परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट आणि बारावीची 21 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.

दहावीचा निकाल लागल्यानंतरही अकरावीच्या प्रवेशाला विलंब होणार आहे. कारण केंद्रीय बोर्डाचे CBSE आणि ICSE चे निकाल अजून जाहीर झालेले नाहीत.

कोरोनामुळे सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा दोन सत्रात झाल्या आहेत. त्यामुळे या मंडळाला पहिली आणि दुसरी सत्र परीक्षांचे गुण एकत्र करून निकाल तयार करायचा आहे. ICSE चा निकाल जुलैमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून वगळता येणार नाही. त्यामुळे सप्टेंबरअखेर ज्युनिअर कॉलेज सुरू होण्याची शक्यता आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा