Advertisement

महापालिकेच्या ११ शाळांना सीबीएसईची मान्यता

मुंबई महापालिकेच्या ११ पब्लिक स्कूलना सीबीएसईनं मान्यता देण्यात आली आहे. याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी ट्वीट करत माहिती दिली.

महापालिकेच्या ११ शाळांना सीबीएसईची मान्यता
SHARES

मुंबई महापालिकेच्या ११ पब्लिक स्कूलना सीबीएसईनं मान्यता देण्यात आली आहे. याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी ट्वीट करत माहिती दिली. महापालिका शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टीनं ११ पब्लिक स्कूलना सीबीएसईकडून मिळालेली मान्यता महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांना महापालिका शाळेत दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आदित्य ठाकरे आणि पालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या ११ पब्लिक स्कूलना सीबीएसईची मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर सीबीएसईकडून या शाळांना मान्यता देण्यात आली आहे.

महापालिका शाळांमध्ये राज्य मंडळ आणि सीबीएसई मंडळाचा अभ्यासक्रम शिकविला जात आहे. भविष्यात आयसीएसई, केंब्रिज आणि आयव्ही मंडळाचा अभ्यासक्रम शिकविला जाईल. 

या माध्मातून पालिका शाळांमध्ये विविध प्रकारचे दर्जेदार मोफत शिक्षण उपलब्ध करण्याचा मानस आहे, असे आदित्य ठाकरे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये कार्यरत सर्व शिक्षण मंडळांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, मराठी भाषेतून गुणात्मक शिक्षण देण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागाची ही कामगिरी कौतुकास पात्र आहे. पण ही फक्त सुरुवात आहे. पालिका शाळांना जागतिक दर्जा मिळवून देण्याचे आपले ध्येय आहे, असंही त्यांनी म्हटलं.

मान्यता मिळालेल्या शाळा

  • मुंबई पब्लिक स्कूल चिकूवाडी
  • मुंबई पब्लिक स्कूल जनकल्याण
  • मुंबई पब्लिक स्कूल प्रतीक्षा नगर
  • मुंबई पब्लिक स्कूल पूनम नगर
  • मुंबई पब्लिक स्कूल मिठागर
  • मुंबई पब्लिक स्कूल हरियाली व्हिलेज
  • मुंबई पब्लिक स्कूल राजावाडी
  • मुंबई पब्लिक स्कूल अजीजबाग
  • मुंबई पब्लिक स्कूल तुंगा व्हिलेज
  • मुंबई पब्लिक स्कूल भवानी शंकर
  • मुंबई पब्लिक स्कूल काणे नगर
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा