Advertisement

CBSE च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर


CBSE च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
SHARES

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (CBSE)ने २०१८ मधील १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या वेळापत्रकानुसार ५ मार्चपासून १० वी आणि १२ वीच्या परीक्षांना सुरूवात होणार आहे. १० वी बोर्डाची परीक्षा ४ एप्रिलपर्यंत चालणार असून १२ वीची परीक्षा १२ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.


कुठले विषय?

५ मार्च रोजी १० वी बोर्डाच्या आॅप्शनल विषयांची परीक्षा असेल, तर याच तारखेला १२ वी बोर्डाच्या इंग्लिश कोअर, इंग्लिश इलेक्टिव्ह-इन आणि इंग्लिश इलेक्टिव्ह-सी विषयाची परीक्षा असेल. ६ मार्च रोजी १० वी बोर्डाच्या हिंदी कोर्स- ए आणि हिंदी कोर्स-बी विषयाची परीक्षा असेल. 

१ मार्च आणि २ मार्चला होळी तसेच रंगपंचमी असल्याने १० वी आणि १२ वीच्या परीक्षा ५ मार्चपासून सुरू करण्यात आल्या आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा