Advertisement

नेट परीक्षा देताय? मग हे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे!

नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट अर्थात नेटच्या परीक्षार्थींसाठी महत्त्वाचे परीपत्रक युजीसीने जारी केले आहे. नेट देणाऱ्या परीक्षार्थींना आता त्यांचे प्रवेशपत्र (Admit Card) युजीसीच्या cbsenet.nic.in या वेबसाईटवरून डाऊनलोड करता येणार आहे. त्यासंबधीची काही महत्त्वपूर्ण माहिती...

नेट परीक्षा देताय? मग हे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे!
SHARES

नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट अर्थात नेटच्या परीक्षार्थींसाठी महत्त्वाचे परीपत्रक युजीसीने जारी केले आहे. नेट देणाऱ्या परीक्षार्थींना आता त्यांचे प्रवेशपत्र (Admit Card) युजीसीच्या cbsenet.nic.in या वेबसाईटवरून डाऊनलोड करता येणार आहे. त्यासंबधीची माहिती युजीसीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

येत्या 5 नोव्हेंबर रोजी देशभरातल्या विविध शहरांमध्ये युजीसीकडून नेटची परीक्षा घेतली जाणार आहे. वेगवेगळ्या शाखांसाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी देशभरातून लाखो विद्यार्थी अर्ज करतात. प्राध्यापक आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिप अर्थात जेआरएफसाठी ही परीक्षा घेतली जाते.


कुठे डाऊनलोड कराल प्रवेशपत्र?

http://cbsenet.nic.in/cbsenet/root/loginpage.aspx



कुठे कराल संपर्क?

प्रवेशपत्र अर्थात अॅडमिट कार्ड डाऊनलोड करताना कोणतीही समस्या आल्यास युजीसीने परीक्षार्थींसाठी काही हेल्पलाईन मोबाईल क्रमांक दिले आहेत. या क्रमांकावर परीक्षार्थी संपर्क करु शकतात :

7042399520

7042399521

7042399525

7042399526

सकाळी 10 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत या क्रमांकावर परीक्षार्थी संपर्क करू शकतात. शिवाय net@cbse.gov.in या मेल आयडीवर युजीसीला मेलही करू शकतात.


महत्त्वाचे...

दरम्यान, कोणत्याही परीक्षार्थीला पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र (Admit Card) मिळणार नाही, प्रवेशपत्र फक्त वेबसाईटवरूनच डाऊनलोड करता येईल, असे युजीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




हेही वाचा

युपीएससीची 'ईएसई' परीक्षा देताय?...मग हे वाचाच!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा