Advertisement

युपीएससीची 'ईएसई' परीक्षा देताय?...मग हे वाचाच!


युपीएससीची 'ईएसई' परीक्षा देताय?...मग हे वाचाच!
SHARES

अभियांत्रिकी सेवा परिक्षा (Engineering Service Examination) २०१८ साठी अधिकृत जाहिरात केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission) प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आता इच्छुक उमेदवार अधिकृत वेवसाईटवरून परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. यासाठी upsc.gov.in या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत.

अभियांत्रिकी सेवा परिक्षेसाठी(ESE) अर्ज करताना विद्यार्थ्यांनी वेबसाईटवर जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार दिलेल्या सर्व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. अर्ज भरताना आपण त्या कॅटेगरीत बसत असल्यास, तरच विद्यार्थ्यांनी अर्ज करणे अपेक्षित आहे. मात्र त्यानंतरही आयोगाकडून ई-सर्टिफिकेट मिळाले याचा अर्थ त्याची उमेदवारी मंजूर झाली, असा होत नसून उमेदवाराची व्यक्तिमत्व चाचणी झाल्यानंतरच उमेदवारी आयोगाकडून मंजूर केली जाईल.

पात्र उमेदवार २३ ऑक्टोबर २०१७ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरू शकतात. परिक्षेतून पात्र विद्यार्थ्यांसाठी साधारणत: ५८८ जागा शिल्लक आहेत.


निवडीसाठीचे संबंधित विभाग

१. सिव्हिल इंजिनिअरिंग

२. मेकॅनिकल इंजिनिअरिंग

३. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग

४. इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग



असा करा अर्ज

१. प्रथम upsc.gov.in या वेबसाईटवर जा

२. होमपेजवर अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१८ या लिंकवर क्लिक करा

३. परिपत्रकातील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा

४. upsconline.nic.in या लिंकवर ऑनलाईन अर्ज भरा


ही आहे २०१८ साठी परीक्षा पद्धती

उमेदवाराच्या ऑब्जेक्टिव्ह पद्धतीमध्ये चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग करण्यात येईल. उत्तरे लिहताना उमेदवारांनी केवळ काळ्या रंगाचे बॉल पेन वापरणे बंधनकारक आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा