Advertisement

छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे मूक निदर्शन !


छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे मूक निदर्शन !
SHARES

मरिन लाइन्स - गेल्या काही दिवसांपासून भारतातील शैक्षणिक संस्थांमध्ये भाजपा प्रणित अभाविप ( अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ) या विद्यार्थी संघटनेकडून होणाऱ्या गुंडशाहीविरोधात छात्र भारतीने गुरुवारी मरिन लाइन्स येथे मूक निदर्शनं केली. गुरमेहर कौर या विधार्थिनीला बलात्काराची धमकी देणाऱ्या समाजकंटकांना सरकारने आवर घालावा अशीही मागणी या वेळी करण्यात आली. गुरमेहर कौरच्या बाजूने सर्व पुरोगामी शक्तींनी उभे राहण्याची गरज असल्याचं छात्र भारतीतर्फे सांगण्यात आले. लोकशाहीवादी भारतात सर्वांना आपलं मत मांडण्याचा अधिकार मिळावा, अभिव्यक्त होण्याचा मानवी हक्क मिळावा यासाठी छात्रभारती आग्रही आहे. असे छात्रभारतीचे राज्य उपाध्यक्ष सागर भालेराव यांनी सांगितले.                                                         

 देशभक्ती - देशद्रोह हा विनाकारण वाद उभा करून वाढती महागाई - बेरोजगारी, जातीयवाद या मूळ प्रश्नांना बगल देण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप देखील सागर भालेराव यांनी केला. मरिन लाइन्स पोलिसांनी मुकपणे निदर्शने करणाऱ्या छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना अटक करत थोड्या वेळाने सोडून दिले. या वेळी छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे, लोकेश लाटे, विद्यापीठ
संघटक रोहीत ढाले, केतकी महाजन, अंकिता काकडे, अनिता इदे, भगवान बोयाळ आदी छात्रभारतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा