छात्रभारतीचे स्वच्छता अभियान

 BMC office building
छात्रभारतीचे स्वच्छता अभियान
छात्रभारतीचे स्वच्छता अभियान
छात्रभारतीचे स्वच्छता अभियान
छात्रभारतीचे स्वच्छता अभियान
See all

परळ - भारतीय स्वतंत्र लढ्यात बलिदान देणारे शहीद बाबू गेनू यांच्या परळच्या केईएम रुग्णालयासमोर असलेल्या पुतळ्याची साफसफाई करण्यात आली. महात्मा गांधी दिनाचे औचित्य साधत छात्रभारतीने सदर पुतळ्याची साफसफाई केली. यापुढे आठवड्यातील दर शुक्रवारी या पुतळ्याची साफसफाई करण्यात येईल, असे यावेळी जाहीर करण्यात आले. महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

'शहिदांच्या नावावर राजकारण करणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन शहिदांची स्मृती जपण्यास असमर्थ ठरले' असल्याचे मत छात्र भारतीचे राज्य सदस्य प्रमोद दिवेकर यांनी व्यक्त केले. तसेच शहिदांचा वारसा जपण्यासाठी आजची पिढी कटिबद्ध असताना त्यांच्या स्मृतीस्थळांचा वारसा देखील जपण्याचा प्रयत्न झाला पाहिजे' असेही दिवेकर म्हणाले. यावेळी सफाईसाठी छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष सागर भालेराव, उपाध्यक्ष सचिन बनसोडे, मुंबई संघटक रोहित ढाले, आणि विशाल कदम यांची उपस्थिती होती.

Loading Comments