Advertisement

बीएमसी शाळांमधील संगणक धुळ खात

खाजगी शाळांप्रमाणे पालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी सर्व पालिका शाळांना मार्च महिन्यात संगणक देण्यात अाले. मात्र, शाळा सुरू होऊन जवळपास पाच महिने उलटून गेले तरीही शाळांनी हे संगणक सुरू केलेले नाहीत.

बीएमसी शाळांमधील संगणक धुळ खात
SHARES

मुंबई महापालिकेच्या शाळेतील संगणक धुळ खात पडले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस अाली अाहे. यामुळं पालिका शिक्षण अधिकाऱ्यांचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला असून पालिकेचे शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.



मार्चमध्ये दिले संगणक 

खाजगी शाळांप्रमाणे पालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी सर्व पालिका शाळांना मार्च महिन्यात संगणक देण्यात अाले. मात्र, शाळा सुरू होऊन जवळपास पाच महिने उलटून गेले तरीही शाळांनी हे संगणक सुरू केलेले नाहीत. गोखले रोड (दक्षिण) बीएमसी शाळा, कुरार विलेज हिंदी मिडियम नं. २ बीएमसी शाळा, प्रतीक्षा नगर बीएमसी शाळा आणि शिवडी कोळीवाडा बीएमसी शाळा या चार शाळांमधील संगणक, की-बोर्ड, सीपीयू तसंच संगणक कक्षातील खुर्च्या धुळखात पडल्या आहेत. 


पालिकेनं ७.४७ कोटी रुपये खर्च करून १७९ प्राथमिक आणि माध्यामिक शाळांना संगणक दिले आहेत. हे संगणक कुठे बसवायचे, कसे बसवायचे हे त्या शाळेतील मुख्याध्यापकाचं काम आहे. त्याशिवाय दुर्गे यांच्याशी चर्चा केल्यानंतर येत्या काही दिवसात १५० शाळांतील संगणक कक्षाची तपासणी करण्यात येणार आहे. 

- महेश पालकर, शिक्षण अधिकारी



हेही वाचा - 

२५ वर्षानंतर होणार विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका

विद्यापीठाच्या उत्पन्नासाठी पुनर्मूल्यांकन एक स्रोत




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा