Advertisement

कोटात पोहोचल्या एसटी बस, विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास सुरू

राजस्थानच्या कोटा शहरात लाॅकडाऊनमुळे अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील सुमारे १८०० विद्यार्थ्यांसाठी धुळे एसटी बस आगारातून रवाना झालेल्या एसटी बस कोटा शहरात पोहोचल्या आहेत. या बसचं निर्जंतुकीकरण झाल्यानंतर या बस विद्यार्थ्यांना घेऊन परतीचा प्रवास सुरू करतील.

कोटात पोहोचल्या एसटी बस, विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास सुरू
SHARES

राजस्थानच्या कोटा शहरात लाॅकडाऊनमुळे अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील सुमारे १८०० विद्यार्थ्यांसाठी धुळे एसटी बस आगारातून रवाना झालेल्या एसटी बस कोटा शहरात पोहोचल्या आहेत. या बसचं निर्जंतुकीकरण झाल्यानंतर या बस विद्यार्थ्यांना घेऊन परतीचा प्रवास सुरू करणार आहेत.

राज्यस्तरीय प्रयत्न

कोटा शहरात अडकलेल्या सुमारे १८०० विद्यार्थ्यांना आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ७३ बस राजस्थानला पाठवण्यात आल्या आहेत. या बस धुळ्यावरून रवाना करण्यात आल्या आहेत. या बस गुरूवारी कोटा इथं पोहोचल्या. त्यानंतर या सगळ्या बसचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं. या बसला पाहून विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार , परिवहन मंत्री अनिल परब यांचे आभार मानले. या विद्यार्थ्यांचा प्रवास मध्यप्रदेश तसंच गुजरात राज्यांतून होणार असल्याने मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबंधित राज्याच्या यंत्रणांशी संपर्कात राहून विद्यार्थ्यांच्या परतीच्या प्रवासाचा मार्ग मोकळा करून दिला. 

पालकांचा दबाव

आयआयटी, मेडिकलच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी राजस्थानमधील कोटा इथं जातात. त्यानुसार हे विद्यार्थी गेलेले असतानाच लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे इतर राज्यांतील विद्यार्थ्यांसोबत महाराष्ट्रातील जवळपास १८०० विद्यार्थी कोटामध्ये अडकून पडले. या विद्यार्थ्यांना परत आणण्याची मागणी सातत्याने पालकांकडून होत असल्याने तसंच इतर राज्यांनी आपापल्या विद्यार्थ्यांना बस पाठवून परत आणल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना पुन्हा राज्यात आणण्यासाठी चर्चा केली होती. तसंच केंद्र सरकारला पत्र देखील पाठवलं होतं. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा