Advertisement

इंजिनीअरिंगचे विद्यार्थी हायकोर्टात, जागांचं प्रमाण १० टक्के करण्याची मागणी

इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाच्या जागांचं प्रमाण २० टक्क्यांवरून १० टक्के करण्याच्या निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं (एआयसीटीई) घेतला आहे. या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

इंजिनीअरिंगचे विद्यार्थी हायकोर्टात, जागांचं प्रमाण १० टक्के करण्याची मागणी
SHARES

इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाच्या जागांचं प्रमाण २० टक्क्यांवरून १० टक्के करण्याच्या निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं (एआयसीटीई) घेतला आहे. मात्र, इंजिनीअरिंग पदविका अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण होण्यापूर्वी तडकाफडकी हा निर्णय न घेता शिक्षण झाल्यावर घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसंच, या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 


जागांचं प्रमाण १० टक्के

सध्या इंजिनीअरिंग पदविका अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरु आहे. त्याशिवाय अभियांत्रिकी विद्याशाखेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी बारावीनंतर थेट पदवी प्रवेशाचा पर्याय असून दहावीनंतर तंत्रशिक्षण पदविकेनंतर अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेश घेता येतो. पदविका अभ्यासक्रमानंतर अभियांत्रिकी प्रवेशासाठी यापूर्वी २० टक्के राखीव जागा होत्या. मात्र, एआयसीटीईनं नव्यानं जाहीर केलेल्या निर्णयानुसार, आता २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी राखीव जागांचं प्रमाण १० टक्के कमी करण्यात आलं आहे. 


प्रवेश मिळणं कठीण

या निर्णयामुळं राज्यभरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशाच्या जागा जवळपास १० टक्के कमी होणार आहेत. त्यामुळं सध्या पदविकेचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीचा प्रवेश घेताना गुणवत्ता असूनही विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळणं कठीण होणार आहे. त्यामुळं या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ करून नये, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे. त्याशिवाय या निर्णयाविरोधात काही पालकांनी या मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.



हेही वाचा -

१४ वर्षांनी नीना कुळकर्णी पुन्हा बनल्या स्वप्नीलची आई

वेंगसरकरांच्या भूमिकेत क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आदिनाथ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा