Advertisement

चारकोपमध्ये शालेय वस्तूंचे वाटप


चारकोपमध्ये शालेय वस्तूंचे वाटप
SHARES

चारकोप - WNS कंपनीतर्फे ज्ञानवर्धिनी विद्यालय,चारकोप या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना शनिवारी वही,पेन,पेन्सिल आणि इतर शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. Wns कंपनीतर्फे सामाजिक जाणीव कार्यक्रम अंतर्गत हा अभिनव कार्यक्रम राबवला गेला. एकूण 221 विद्यार्थ्यांना कार्यक्रमाअंतर्गत वस्तूंचे वाटप करण्यात आले. शाळेतील मुलांना प्रत्यक्ष मदत देऊन खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न फार सुखदायी आहे, असे स्थानिक कार्यकर्ते घनश्याम देकटे यांचे म्हणणे आहे. यावेळी कंपनीतर्फे प्रशांत कोचरेकर, निखिल चव्हाण,कॅसिलिडा मेंनडोंझा, अशीमा महेंद्रा, योगेश जाधव इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement