Advertisement

'या' अनधिकृत शाळांत प्रवेश घेऊ नका..!


'या' अनधिकृत शाळांत प्रवेश घेऊ नका..!
SHARES

मुंबईत अनधिकृत शाळांचं प्रमाण वाढू लागलं आहे. अशा शाळांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची फसवणूक होत असल्याने राज्य सरकारने शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या यादीत वांद्रे ते दहिसर परिसरात १४ शाळा अनधिकृत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

या शिक्षणसंस्थांनी शासनाची परवानगी न घेता अनधिकृत शाळा सुरु केलेल्या आहेत. त्यामुळे या अनधिकृतपणे सुरु असलेल्या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांना टाकू नये, असं आवाहन शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई, पश्चिम विभाग यांनी केलं आहे.


अनधिकृत शाळांची यादी खालीलप्रमाणे :

  1. एच वाॅर्ड, सीबीएसई (इंग्रजी), ज्यु. केजी ते १ ली, नवजीवन ग्लोबल स्कूल, एमआयजी कल्ब शेजारी, वांद्रे (पू), मुंबई.
  2. केपी-पूर्व वाॅर्ड, एस.एस.सी.(इंग्रजी), इयत्ता ५ वी ते ९ वी, यंग इंडियन हायस्कूल, जोगेश्वरी (पू), मुंबई.
  3. केपी-पूर्व वाॅर्ड, एस.एस.सी.(इंग्रजी), इयत्ता १ ली ते ९ वी, किड्स किंगडम हायस्कूल, ऑर्केड मॉल, रॉयल पाम, आरे कॉलनी, गोरेगाव, (पू), मुंबई.
  4. केपी-प वाॅर्ड, एनआयओएस (इंग्रजी), इयत्ता १ ली ते ५ वी, पोअर्ल ॲण्ड कोबलम इंग्लिश स्कूल, मिल्लत नगर, अंधेरी (पू), मुंबई.
  5. केपी-प वाॅर्ड, एस.एस.सी.(इंग्रजी), इयत्ता ८ वी ते १० वी, एतमत हायस्कूल, मोतीलाल नगर-१, गोरेगाव, (प.)
  6. केपी-प वाॅर्ड, आयजीसीएसई (इंग्रजी), इयत्ता १ ली ते १० वी, बेलवर्डर इंटरनॅशनल स्कूल, अंधेरी (प), मुंबई.
  7. पी वाॅर्ड, एस.एस.सी.(इंग्रजी), इयत्ता ८ वी, होली सदर इंग्लिश स्कूल, कुरार व्हिलेज, मालाड (पू)
  8. आर-पूर्व वाॅर्ड, एस.एस.सी.(इंग्रजी), इयत्ता ९ वी, डी.व्ही.एम.हायस्कूल, पोयसर, कांदीवली (पू), मुंबई.
  9. आर-पूर्व वाॅर्ड, एस.एस.सी.(इंग्रजी), इयत्ता ९ वी, विद्याभूषण हायस्कूल, रावलपाडा, दहिसर, (पू)
  10. आर-पश्चिम वाॅर्ड, एस.एस.सी.(इंग्रजी), इयत्ता ९ वी ते १० वी, मारीया हायस्कूल, गणेश नगर, कांदीवली, (प), मुंबई.
  11. आर-पश्चिम वाॅर्ड, एस.एस.सी.(इंग्रजी), इयत्ता ९ वी, साई ॲकॅडमी, गणेश नगर, कांदिवली, (प), मुंबई.
  12. आर-पश्चिम वाॅर्ड, एस.एस.सी.(इंग्रजी), इयत्ता ९ वी ते १० वी, ब्राईट लाईट हायस्कूल, भाब्रेकर नगर, कांदिवली (प)
  13. आर-पश्चिम वाॅर्ड, एस.एस.सी.(इंग्रजी), इयत्ता ९ वी, एस.के.भाटीया, हायस्कूल, साईबाबा नगर, बोरीवली (प)
  14. आर-पश्चिम वाॅर्ड, एस.एस.सी.(इंग्रजी), इयत्ता ९ वी १० वी, शिवशक्ती हायस्कूल, गणेश नगर, बोरीवली (प)

शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम विभाग, जोगेश्वरी (पू.), मुंबई-६० यांचं कार्यक्षेत्र वांद्रे ते दहिसर (रेल्वेच्या दोन्ही बाजू) आहे. अनधिकृतपणे सुरु असलेल्या शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस ते स्वत: जबाबदार असतील, असंही शालेय शिक्षण विभागाच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा