दहावी,बारावीची खोटी वेळापत्रके व्हायरल


SHARE

मुंबई - व्हॉट्सअप वर कोणत्या अफवा पसरतील हे सांगू शकत नाही..काही दिवसांपासून व्हॉट्सअपवर दहावी आणि बारावीची 2017 ची वेळापत्रके फिरत आहेत..ही वेळापत्रकं खुद्द राज्य शिक्षण मंडळालाचं डोकेदुखी झालीये.त्यामुळे ही वेळापत्रके खोटी असल्याचं आणि त्यावर कोणत्याही प्रकारे विश्वास ठेऊ नका,हे सांगण्यासेठी राज्य शिक्षण मंडळाला एक परिपत्रक जाहीर करावे लागले आहे.. त्याचप्रमाणे लवकरच 2017 साठी वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असंही या परिपत्रकात म्हटलं आहे.अद्याप कोणत्याही तारखा जाहीर केल्या नसल्याचं स्पष्टीकरण राज्य शिक्षण मंडळाने या परिपत्रकाद्वारे दिल आहे. त्यामुळे या अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केलय. अधिकृत तारखा आणि वेळापत्रक विद्यार्थ्यांना www.mahasscboard.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर पाहता येईल,अशी माहिती मंडळाने दिली..

संबंधित विषय
ताज्या बातम्या