जब्बार पटेल देणार चित्रपट समिक्षणाचे धडे

 Pali Hill
जब्बार पटेल देणार चित्रपट समिक्षणाचे धडे

मुंबई - महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चित्रपट समिक्षण कार्यशाळचे आयोजन करण्यात येणार आहे. 9 डिसेंबरला सकाळी साडे नऊ ते 5 वाजेपर्यंंत मुंबई विद्यापिठातील अल्केश मोदी हॉल येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला डॉ. जब्बार पटेल येणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा मोफत असणार आहे. जानेवारी 2017 मध्ये यशवंतराव चव्हाण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. दरवर्षी यशवंतराव चव्हाण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव काहीतरी वेगळं देत असतं. यावर्षी या चित्रपट महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केलेले चित्रपटाचे समिक्षण.

Loading Comments