Advertisement

दहावीनंतर थेट पंधरावीत प्रवेश


दहावीनंतर थेट पंधरावीत प्रवेश
SHARES

मुंबई - औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत दहावीनंतर दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता बारावीएेवजी थेट पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेता येणार आहे. नॅशनल अाेपन स्कूलकडून दोन विषयांची आॅनलाइन परीक्षा डिसेंबरमध्ये घेतली जाणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या अायटीअाय विद्यार्थ्यांना बारावी समकक्ष करण्याचा महत्त्वाचा निर्णय व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाने घेतला अाहे. त्याबाबतचे परिपत्रक शुक्रवारी काढण्यात अाले. केंद्र सरकारने १५ जुलै राेजी अाैद्याेगिक प्रशिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार दहावी आणि बारावीचे प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग सुकर करण्याची घाेषणा केली. राज्य सरकारनेदेखील त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला अाहे.

बारावी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना २ हजार ४६० रुपयांचा डीडी ‘सेक्रेटरी, एनआयओएस’च्या नावे काढून द्यावा लागणार आहे. विद्यार्थ्यांकडील सर्व कागदपत्रे आॅनलाइन सादर करावी लागणार असून दोन विषयांच्या परीक्षा शुल्काचा डीडी मात्र पोस्टाने पाठवावा लागेल. यासाठी आयटीआयमध्ये सर्व माहिती उपलब्ध अाहे. ३० सप्टेंबरपर्यंत अाॅनलाइन अर्ज करता येऊ शकतील, असे व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे उपसंचालक योगेश पाटील यांनी सांगितले.

१०, ११ डिसेंबर रोजी परीक्षा

परीक्षेसाठी अाॅनलाइन अर्ज केलेल्यांची हिंदी, इंग्रजी भाषेतील परीक्षा अाणि राेजगारक्षम काैशल्य अाणि उद्याेजकता परीक्षा १० अाणि ११ डिसेंबर रोजी मुंबईतील अॅडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे घेण्यात येणार अाहे.

ही कागदपत्रे अावश्यक

आयटीआयकडून मिळालेले व्यवसाय प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासबुक, दहावीची मूळ गुणपत्रिका आदी माहिती आॅनलाइन अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा