Advertisement

विज्ञानाला अध्यात्माची जोड देण्यासाठी आय-आर्टिस्टची स्थापना


विज्ञानाला अध्यात्माची जोड देण्यासाठी आय-आर्टिस्टची स्थापना
SHARES

व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता, सौहार्दाच्या वातावरणाची निर्मिती ही सर्वात मोठी गरज आहे. त्यादृष्टीनं एक आश्वासक पाऊल म्हणून आंतरराष्ट्रीय अहिंसा संशोधन आणि अध्यात्म तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेनं (आय-एआरटीआयएसटी-आय-आर्टिस्ट) विज्ञानाला अध्यात्माची जोड देण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांबरोबर काम करावं, असं आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गुरुवारी, २१ जूनला केलं.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचं निमित्त साधून राजभवन येथ तुलसी महाप्रग्या प्रग्या भारती ट्रस्ट, विरार येथील इंटरनॅशनल अहिंसा रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ स्पिरीच्युअल टेक्नॉलॉजी (आय-स्मार्ट) या स्वायत्त संस्थेचा शुभारंभ राज्यपालांच्या हस्ते झाला.

योग ही भारतीय संस्कृतीची देणगी असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्वरुपात जगानं योगाला स्वीकारलं ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असं त्यांनी सांगितलं. तसच गेल्या चार वर्षात जगातील अनेक देशांमध्ये योगाचा प्रसार झाला. न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस आणि इतर अनेक ग्लोबल शहरं आणि जगभरातील सर्व खंडांमध्ये योग दिन साजरा केला जात आहे.

वैयक्तिक पातळीवर, सामाजिक स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही अशांतता, गोंधळ आणि अस्वस्थता आहे. काही देश युद्ध आणि विनाशाची भाषा करत आहेत. हे पाहता विश्वाला अध्यात्मिक शिकवण देण्याची गरज असल्याचं राज्यपाल म्हणाले.

‘आय-स्मार्ट’ या संस्थेमध्ये व्यक्तिमत्व विकास, सकारात्मक विचार, भावना, सकारात्मक वर्तन पद्धती, शारीरिक आणि मानसिक उपचारांसाठी मानसशास्त्राचा उपयोग आदींचा अभ्यास केला जाणार असून व्यक्तींमधील परस्पर संबंध सौहार्दाचे करण्यासाठीच्या अभ्यासपद्धतीवरही संशोधन केल जाणार आहे. 

- मुनी महेंद्रकुमार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा