Advertisement

राज्यातील २९०७ शाळा, ४३१९ तुकड्यांना अनुदान


राज्यातील २९०७ शाळा, ४३१९ तुकड्यांना अनुदान
SHARES

 राज्यातील २ हजार ९०७ शाळा व ४ हजार ३१९ तुकड्यांना अनुदान देण्याचा निर्णय बुधवारी जाहीर करण्यात अाला.  या निर्णयाचा लाभ३० हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली.  अनुदानासाठी सरकारकडून २७५ कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, असंही तावडे यांनी सांगितलं अाहे. 


अर्थसंकल्पीय अधिवेशनात  तरतूद 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक आमदार व पदवीधर मतदारसंघातील आमदारांची बैठक पार पडली.  बैठकीत अनेक वर्षांपासून अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. बैठकीनंतर विधान परिषदेत शिक्षण मंत्री तावडे यांनी अनुदानाची घोषणा केली. दोन महिन्यांत प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करुन आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनुदानाची तरतूद केली जाईल, असं तावडे यांनी स्पष्ट केलं. 


२० टक्के अनुदान

 ५६० अघोषित उच्च माध्यमिक शाळा, कार्योत्तर मान्यता अट शिथिल केल्यानंतर पात्र होणाऱ्या १९३ उच्च माध्यमिक शाळा, अघोषित ४०३ प्राथमिक शाळा व १८९२ तुकड्या, घोषित उच्च माध्यमिक शाळांच्या १५ तुकड्या, घोषित उच्च माध्यमिक १२३ शाळा व २३ शाळांच्या अतिरिक्त तुकड्या, १९ सप्टेंबर २०१६ अन्वये २० टक्के अनुदानप्राप्त १६२८शाळा व २४५२ तुकड्यांना पुढील २० टक्के अनुदान दिले जाणार आहे. हेही वाचा - 

शाळा शुल्कवाढीविरोधात एकट्या पालकाला तक्रार करता येणार नाही

यंदाच्या दहावीच्या प्रश्नपत्रिका प्रश्नसंचाविना
संबंधित विषय