12वी प्रवेश यंदाही ऑफलाइनच


SHARE

शालेय शिक्षण विभागातर्फे 12 वीच्या ऑनलाइन प्रवेशाची कोणतीही तयारी न झाल्याने मागच्यावर्षीप्रमाणे यावर्षीही शालेय शिक्षण विभागाने माघार घेतली आहे. 2018-19 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 12वीचे प्रवेश ऑफलाइनच करावेत अशी सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.


पुन्हा तेच

गेल्या अनेक वर्षापासून अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होतात. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना अकरावीला नामांकीत आणि आवडीच्या महाविद्यालयातील प्रवेशाचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे अकरावीला ऑनलाइन प्रवेश घेऊन बारावीला महाविद्यालय बदलणाऱ्यांचं प्रमाण वाढलं होतं. दरम्यान या सर्व प्रकरणाला आळा घालण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून अकरावी प्रवेशांबरोबरच बारावीचे प्रवेशही ऑनलाइन पद्धतीने करण्याचे विचार शासनाद्वारे करण्यात येत होता. परंतु, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही हा निर्णय विचारापुर्ती मर्यादित राहिला असल्याचं स्पष्ट होत आहे.

दरम्यान यंदाही पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन प्रवेश होणार असल्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयांनी डेटाबेसमध्ये बदल करणे आवश्यक असणार आहे. त्याशिवाय 2018-19 या वर्षात काही विशिष्ट कारणास्तव महाविद्यालय बदलून घेता येतील असंही या निर्णयात म्हटलं आहे.


ही आहेत कारण

  • सध्या विद्यार्थी शिक्षण घेत असलेले महाविद्यालय घरापासून लांब असणे

  • पालकांची बदली होणे

  • वैद्यकीय कारणास्तव परिसरात कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळणे

  • शाखा बदलून मिळणे

  • विद्यार्थ्यांचा राहण्याचा पत्ता बदलणे

  • बारावीमध्ये विद्यार्थ्याला बोर्ड बदलण्याचा असल्यास

संबंधित विषय
ताज्या बातम्या