Advertisement

कोरियन, भारतीय चित्रकारांच्या ‘बियाँड द फ्रेम्स’चं चित्रप्रदर्शन


कोरियन, भारतीय चित्रकारांच्या ‘बियाँड द फ्रेम्स’चं चित्रप्रदर्शन
SHARES

आतापर्यंत आपण होम अप्लायंसेस आणि ऑटोमोबाईल या दोनच गोष्टीसाठी कोरियाला ओळखतो. मात्र लवकरच कलेच्या माध्यमातून भारत आणि दक्षिण कोरिया या दोन देशांच्या संस्कृती एकमेकांजवळ येणार आहेत. या आर्ट डिप्लोमेसीबाबत सर जे. जे. कला कॉलेज अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं मत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलं.

IMG-20181013-WA0067.jpg


चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन

सर जे. जे. कला कॉलेज आणि दक्षिण कोरियातील के-आर्ट इंटरनॅशनल एक्स्चेंज असोसिएशन यांनी प्रथमच आयोजित केलेल्या ‘मुंबई-कोरिया बिनाले’ या संयुक्त चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन शनिवारी करण्यात आलं. ‘बियाँड द फ्रेम्स’ अर्थात ‘चौकटीपल्याड’च्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला दिल्लीतील ललिक कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे, कोरियातील अंगुक झेन सेंटरचे संचालक सुबुल सुनिम, कोरियाचे सदिच्छादूत वेणू श्रीनिवासन, कोरियाचे कौन्सुल जनरल किम साउंग्यून यांच्यासह कला कॉलेजचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

IMG-20181013-WA0065.jpg

प्रदर्शन कधीपर्यंत?

जे. जे. कला कॉलेजमध्ये लवकरच एक आर्ट गॅलरी निर्माण करण्यात येणार आहे. कोरियातील १२० तर महामुंबई क्षेत्रातील ७० हून अधिक चित्रकार, शिल्पकार, प्रिंटमेकर्स यांच्या कलाकृती एकत्रितपणं अनुभवण्याची संधी या प्रदर्शनात कला रसिकांना झाली आहे. हे चित्रप्रदर्शन १४ ते १८ ऑक्टोबर २०१८ दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

IMG-20181013-WA0068.jpg

कला ही संस्कृतीची वाहक आहे. तिला प्रोत्साहन देणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. भविष्यात कलाविषयक अधिकाधिक उपक्रम आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असून त्यासाठी कंपन्यांनीही कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत कला उपक्रमांना सहकार्य करण्याची गरज आहे.
- प्रा. विश्वनाथ साबळे, अधिष्ठाता, सर जे. जे. कला महाविद्यालय

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा