Advertisement

म्हणून, आयआयटी प्लेसमेंट्सच्या पहिल्या टप्प्यात चुरस


म्हणून, आयआयटी प्लेसमेंट्सच्या पहिल्या टप्प्यात चुरस
SHARES

भरघोस पगारासाठी प्रसिद्ध असलेल्या आयआयटी प्लेसमेंटचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे आयआयटीयन्सना मिळणारे कोट्यवधीचे पॅकेजेस यावेळीही पहायला मिळाले. प्री प्लेसमेंट्स ऑफर्स आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग हे या पहिल्या टप्प्याचे वैशिष्ट्य म्हणून समोर आले आहे. पहिल्या टप्प्याच्या प्लेसमेंट प्रक्रियेत आत्तापर्यंत निरनिराळ्या क्षेत्रातील ३१० कंपन्यांनी आपला सहभाग दाखवला आहे. प्री प्लेसमेंट्सच्या ऑफर्स मिळून आतापर्यँत १०११ विद्यार्थ्यांना या कंपन्यांकडून ऑफर्स मिळाल्याची माहिती आयआयटीकडून मिळाली आहे. पुढच्या काही दिवसांत विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या पुष्टीनंतर हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.


प्लेसमेंट्सचा दुसरा टप्पा जानेवारीमध्ये


आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये १ डिसेम्बरपासून कॅम्पस प्लेसमेंटला सुरुवात झाली होती. शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे १६ डिसेंबरपर्यंत याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यंदा या प्लेसमेंटमध्ये तब्बल ३१० कंपन्यांनी सहभाग घेतला होता.


यंदा सर्वाधिक ऑफर्स

यामध्ये आतापर्यंत सॅमसंग कंपनीने गेल्या ३ वर्षांतील सर्वाधिक ऑफर विद्यार्थ्यांना दिला आहेत. २०१६ - १७ मध्ये इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपन्यांनी विद्यार्थ्यांना सर्वाधिक ऑफर्स देऊ केल्या. २०१७ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील ३ संस्थांनी २१ ऑफर्स देऊ केल्या असून दुसऱ्या टप्प्यात हा आकडा आणखी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसंच ५ सरकारी संस्थांकडून २४ ऑफर्स देण्यात आल्या आहेत. आयआयटी प्लेसमेंटचा दुसरा टप्पा जानेवारी महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती प्लेसमेंट विभागाकडून देण्यात आली आहे.


इतक्या विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या ऑफर्स

प्लेसमेंट्सच्या पहिल्या दिवशी अनेक कंपन्यांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना ऑफर्स देण्याची चुरस दिसून आली. पहिल्याच दिवशी एकूण १७६ विद्यार्थ्यांना ऑफर्स देण्यात आल्या. यापैकी १६२ विद्यार्थ्यांनी ऑफर्स स्वीकारल्या. तर दुसऱ्या दिवशी २१५ मधील १८५ विद्यार्थ्यांनी ऑफर्स स्वीकारल्या गेल्याची माहिती मिळाली आहे.


आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा वाढता सहभाग

अमेरिका आणि जपान सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या वाढत्या सहभागामुळे आयआयटी प्लेसमेंटचा दर्जा अधिक वाढत आहेत. यंदा ३८ आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आयआयटी प्लेसमेंटमध्ये सहभाग दाखवला आहे. ऑप्टिमायर्स, मायक्रोसॉफ्ट, मर्चरी, सॅमसंग कोरिया अशा कंपन्यांनी विद्यार्थ्यांना ऑफर्स देऊ केल्या आहेत. मागील वर्षी एकूण ६५ ऑफर्स मिळाल्या होत्या, तर यंदा त्यात वाढ झाली असून एकूण ७४ सिलेक्शन झाले आहेत.


ऑफर्सची संख्या 

(क्षेत्रानुसार):

  • इंटेल (अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान - २५),
  • गोल्डमन साक्स (फायनान्स - २४),
  • पीडब्ल्यूसी (सल्लागार - १९)


अभ्यासक्रमानुसार ऑफर्सची संख्या :

  • बी.टेक (४०७),
  • ड्यूल डिग्री (१४७), एम. टेक (३६०)
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा