आयसीएसईचा दहावी-बारावीचा निकाल सोमवारी

येत्या सोमवारी १४ मे रोजी काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झाम आयसीएसई, आयएसई मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होणार आहेत.

SHARE

मे महिना सुरू झाला की, दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाचे वारे वाहू लागतात. त्याप्रमाणे येत्या सोमवारी १४ मे रोजी काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झाम आयसीएसई, आयएसई मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होणार आहेत.


निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर

सोमवारी दुपारी ३ वाजता दहावी-बारावीचे निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार असून www.cisce.org किंवा www.results.cisce.org या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे ०९२४८०८२८८३ या क्रमांकावर विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक पाठवल्यानंतरही तुम्हाला एसएमएसद्वारे निकाल मिळू शकेल.


सीबीएसईचा निकालही लवकरच

१४ मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सात दिवसांमध्ये २१ मे पर्यंत पुर्नतपासणीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच आयसीएसईच्या निकालानंतर मे महिन्याच्या साधारण शेवटच्या आठवड्यात केंद्रीय शिक्षण मंडळ (सीबीएसई) चा निकाल जाहीर होण्याची शक्यता असून अद्याप निकालाची तारीख जाहीर केलेली नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या