Advertisement

2 फेब्रुवारीला राज्यातील कनिष्ठ महाविद्यालये राहणार बंद!


2 फेब्रुवारीला राज्यातील कनिष्ठ महाविद्यालये राहणार बंद!
SHARES

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मान्य मागण्यांची अंमलबजावणी आणि पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे राज्यात ५ टप्प्यात आंदोलन करण्यात येत आहे. आता आंदोलनाचा चौथा टप्पा २ फेब्रुवारी रोजी होणार असून या दिवशी राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये (ज्युनिअर कॉलेज) बंद राहणार आहेत. या आंदोलनादरम्यान जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आणि मुंबईत आझाद मैदान येथे 'जेलभरो' आंदोलन करण्यात येणार आहे.


...तर १२ वीच्या परीक्षांवर बहिष्कार!

'शासनाने तातडीने मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत आदेश न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. नाईलाजाने १२ वी बोर्ड परीक्षेच्या काळात 'बहिष्कार आंदोलन' करण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल,' असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.


काय आहेत मागण्या?

  • १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्यांनासुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करा
  • २०१२ पासूनच्या शिक्षकांना नियुक्ती मान्यता आणि वेतन द्या
  • सर्व शिक्षकांना २४ वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी द्या
  • कायम विना अनुदानित शिक्षकांना अनुदान द्या
  • माहिती तंत्रज्ञान शिक्षकांना अनुदान द्या
  • २००३ ते २०१०-११ पर्यंतच्या वाढीव पदांवरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता आणि वेतन द्या
  • सातवा वेतन आयोग तातडीने लागू करा

वरील मागण्यांसह अन्य ३२ मागण्यांचे निवेदन शासनास देण्यात आल्याचे म. रा. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा