Advertisement

मुंबईच्या शाळांबाहेर जंकफूड विक्रीस बंदी

साखर, मीठ आणि मैदा यांचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांमुळे विद्यार्थ्यांचे वजन वाढून ते लठ्ठ होत आहेत. जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता असल्यामुळे वडापाव, मिसळ, चिप्स याच्यासह १२ पदार्थांना शाळेच्या उपहारगृहातून हद्दपार करण्यात आले होते.

मुंबईच्या शाळांबाहेर जंकफूड विक्रीस बंदी
SHARES

पालिकेच्या नवीन फेरीवाला धोरणानुसार मुंबईतल्या शाळा आणि रुग्णालयाबाहेर आता जंकफूडची विक्री करणाऱ्यांवर पालिकेनं बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा आणि १०० रुग्णांची क्षमता असणाऱ्या रुग्णालयाबाहेर चणे, शेंगदाणे, फळे आणि नारळ पाणी व्यतिरिक्त कोणतेही खाद्यपदार्थ विकता येणार नसल्याचं या धोरणात म्हटलं आहे


पदार्थांची नवीन यादी 

शाळा आणि रुग्णालयाबाहेर कमी खर्चात मिळणारा नागरिकांचा सर्वात आवडता पदार्थ वडापाव आता दिसणार नाही. जास्त मीठ आणि मैदाचा वापर करून तयार केलेल्या पदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे काही दिवसांपूर्वी शाळा आणि महाविद्यालयाच्या उपहारगृहातही तळलेल्या पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला होता. तसंच उपहारगृहांमध्ये काय असावं आणि नसावे यासंदर्भातील पदार्थांची नवीन यादी शिक्षण विभागाच्यावतीनं जाहीर केली होती


१२ पदार्थ हद्दपार

विद्यार्थ्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास व्हावा, यासाठी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं राज्य सरकारला नवीन पदार्थ कळवले होते. राष्ट्रीय पोषण आहार संस्थेच्यावतीनं विविध राज्यातील शाळांमध्ये असणाऱ्या पदार्थांचे नमुने घेतले होते. त्यानुसार संस्थांनी संबंधित पदार्थांच्या शिफारशी केल्या आहेत. या शिफारशीनुसार शाळेत कोणत्या वस्तू असतील याची यादी शाळांना दिली होती. साखर, मीठ आणि मैदा यांचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांमुळे विद्यार्थ्यांचे वजन वाढून ते लठ्ठ होत आहेत. जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता असल्यामुळे वडापाव, मिसळ, चिप्स याच्यासह १२ पदार्थांना शाळेच्या उपहारगृहातून हद्दपार करण्यात आले होते. या पदार्थांमुळे विद्यार्थी आजारी होत असल्याचं कारण यावेळी शिक्षण विभागाच्यातीनं देण्यात आलं होतं.


शाळांबाहेर सरास विक्री

शिक्षण विभागानं घेतलेल्या निर्णयानंतर शाळेच्या उपगृहातून हे १२ पदार्थ हद्दपार झाले खरे. मात्र शाळा आणि रुग्णालयांच्या बाहेर हे पदार्थ अनधिकृतरित्या फेरीवाले विकत असल्यामुळे मुले त्या ठिकाणी जाऊन ते पदार्थ खातात. त्यामुळे महापालिकेनं फेरीवाला धोरणाअंतर्गत हे तळलेले पदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांना शाळा आणि रुग्णालयाच्या १०० मीटर बाहेर ढकलले आहे. त्यामुळे लवकरच शाळा आणि रुग्णालयाबाहेरील नजीकच्या अंतरावरील खाऊ गल्ल्या बंद होण्याची शक्यता आहे.  फेरीवाल्यांना आता तळलेले पदार्थ १०० मीटर अंतराच्या आतमध्ये विकता येणार नाहीत. तसंच धार्मिक स्थळांसाठीही या नियमाची अंमलबजावणी केली आहे. तर मंदिर परिसरात फक्त प्रार्थनेशी संबंधित वस्तू विकण्याबर बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र सरकारी, खासगी कंपन्यांसमोर जंक फूड विकण्यासाठी कंपन्यांच्या कामाच्या वेळेत त्यांना धंदा करता येणार आहे.


शाळांमध्ये काय नसावे?

बटाट्यांपासून तयार केलेले पदार्थ, चिप्स, सरबत, शीतपेय, गुलाबजाम, पेढा, कलाकंद, नुडल्स, पिझ्झा, बर्गर, टिक्का, पाणीपुरी, सर्व प्रकारच्या गोळ्या, जिलेबी, चॉकलेट्स, मिठाई, केक, बिस्कीट, पेस्ट्री आणि जेली


हे पदार्थ असावेत

इडली, मेंदूवडा, सांबर, खीर, लस्सी, उपमा, सॅण्डवीच, शिकंजी, नारळाचे पाणी, जलजिरा, गहू रोटी, पराठा, भाजी, भात, भाजी, पुलाव, डाळ, भाजीपुलाव, गव्हाचा हलवा, गोड दलिया, राजमा, कढीभात, पपई, अंडी, हिरवे चणे, टोमॅटो



हेही वाचा

शिक्षकांचे आंदोलन मागे, निकाल वेळेतच लागणार


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा