Advertisement

तामिळ शाळेची पुनर्बांधणीच्या नावाखाली केवळ डागडुजी


तामिळ शाळेची पुनर्बांधणीच्या नावाखाली केवळ डागडुजी
SHARES

धारावीच्या मुख्य रस्त्यावरील कन्नड चाळ तामिळ स्कूल ही मुंबईतल्या अनेक जुन्या शाळांपैकी एक आहे. सध्या मात्र त्या शाळेची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे शाळेची पुनर्बांधणी व्हावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक रहिवासी करत आहेत. सध्या शाळेत रंगरंगोटीचं काम सुरू आहे. मात्र रंगरंगोटी ही केवळ मलमपट्टीच असल्याचं चित्र दिसत आहे.

शाळेच्या इमारतीची पडझड झालेली आहे. शाळेवर पत्रा असल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पावसाळ्यात तर छतावरून पाणी गळत असल्याने मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. आजही ही शाळा बैठ्या वर्ग खोल्यांमध्ये भरते. यावर्षी शाळेच्या नुतनीकरणाला मुहूर्त मिळाला आहे. मात्र कंत्राटदार शाळेची पुनर्बांधणी करण्याऐवजी केवळ मलमपट्टी करत आहेत. याविषयी कंत्राटदाराला विचारले असता त्याने बोलण्यास नकार दिला. याबाबत शाळेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोला, आम्ही याविषयी काही सांगणार नाही, असं उत्तर कंत्राटदाराकडून देण्यात आलं. शाळेच्या दुरूस्तीच्या ठिकाणी तर याविषयी उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली.

लवकरच मी शाळेला भेट देईन आणि शाळेच्या इमारतीच्या डागडुजीचं काम शाळा सुरू होण्याअगोदर पूर्ण होईल याची काळजी घेण्यात येईल, असं शिक्षण समितीच्या अध्यक्षा शुभदा गुडेकर यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा