Advertisement

पायाभूत चाचण्यांचा खर्च कोटींच्या घरात!


पायाभूत चाचण्यांचा खर्च कोटींच्या घरात!
SHARES

प्रश्नपत्रिकांचे झेरॉक्स वाटण्याचे प्रकार, पेपरफुटी अशा कारणानं नेहमी चर्चेत असलेल्या संकलित आणि पायाभूत चाचण्यांसाठी शालेय शिक्षण विभागानं गेल्या शैक्षणिक वर्षात कोट्यवधींचा खर्च केल्याचं समोर आलं आहे.


विद्यार्थ्यांच्या पायाभूत गुणवत्तेचं मूल्यमापन

विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेचं मूल्यांकन करण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून इयत्ता दुसरी ते नववी वर्गातील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेतली जाते. या चाचणीच्या प्रश्नपत्रिका महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाकडून उपलब्ध करून दिल्या जातात. परीक्षांमध्ये एकसूत्रता आणण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या पायाभूत गुणवत्तेचं मूल्यमापन करण्याच्या उद्देशानं सदर परीक्षा घेतली जाते. या परीक्षांसाठी कोट्यवधींचा खर्च आल्याची माहिती विद्या प्राधिकरणानं अरविंद नाईक यांना माहिती अधिकारातून दिली आहे.


खर्च कोटींच्या घरात

पायाभूत चाचणीचे मराठी, गणित, इंग्रजी आणि विज्ञान हे पेपर होतात. छपाई करून सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वितरीत करण्याचा खर्च कोटींच्या घरात आहे. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात संकलित मूल्यमापन चाचणीच्या छपाईसाठी २ कोटी ९१ लाख ८० हजार १७१ रुपये खर्च केला आहे. तर पायाभूत चाचणीसाठी २ कोटी ५७ लाख ९३ हजार ३७८ रुपये खर्च केला असून एकूण तब्बल ५ कोटी ४९ लाख ७३ हजार ५४९ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

संकलित मूल्यमापन १ चाचणीसाठी ३ कोटी ४२ लाख ५० हजार ६४५ खर्च केला आहे. तर प्रश्‍नपत्रिका वितरित करण्यासाठी २०१५-१६ या शैक्षणिक वर्षातसाठी १६ लाख ४५ हजार ४१४ रुपये तर पायाभूत चाचणीसाठी २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात २ लाख ९३ हजार रुपये वाहतुकीसाठी खर्च केला आहे. तर मूल्यमापन चाचण्यांसाठी ३१ लाख ३६ हजार ८०५ इतका खर्च करण्यात आल्याचीही माहिती आरटीआयमधून देण्यात आली आहे.


(२०१५-१६) प्रश्‍नपत्रिका छपाईसाठी चाचण्यांचा खर्च (रुपयांत)

  • संकलित मूल्यमापन १ चाचणी : २,९१,८०,१७१
  • पायाभूत चाचणी : २,५७,९३,३७८
  • 2016-17 पायाभूत चाचणी : ३,१४,९६,४४०
  • संकलित मूल्यमापन १ : ३,४२,५०,६४५
  • संकलित मूल्यमापन १ : ३,५०,६७,६००


(२०१५-१६) प्रश्‍नपत्रिका वाहतूकीसाठी आलेला खर्च : (रुपयांत)

  • संकलित मूल्यमापन २ चाचणी : १६,४५,४१४
  • २०१६-१७ पायाभूत चाचणी : २९,३५,२८६
  • संकलित मूल्यमापन १ : ३०,०६,३९०
  • संकलित मूल्यमापन १ : ३१,३६,८०५संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा