• राज्याचा स्कूल सेफ्टी प्रोग्राम 'धोक्यात'
SHARE

आपत्कालीन स्थितीचा सामना कसा करावा? यासाठी जिल्हावार शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य सरकारने 'स्कूल सेफ्टी प्रोग्राम' तयार केला खरा, पण हा प्रोग्राम २०१६ पासून लालफितीत अडकल्याची माहिती 'मुंबई लाइव्ह'ला मिळाली आहे.


काय आहे स्कूल सेफ्टी प्रोग्राम?

  • या प्रोग्राममध्ये प्रत्येक जिल्ह्यातील १०० शाळांमधून ३५ शिक्षकांची निवड करण्यात येईल. या शिक्षकांना 'मास्टर ट्रेनर' म्हणून आपत्कालीन परिस्थितीत काम करण्याचे ५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या शिक्षकांवर प्रत्येकी ३ शाळांतील शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपविण्यात येईल.
  • त्यानुसार या 'मास्टर ट्रेनर्स'ना आपल्याकडील तीन शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण द्यायचे आहे. या प्रशिक्षणावर राज्य सरकारद्वारे मध्यवर्ती केंद्रामार्फत देखरेख ठेवण्यात येईल. या शिक्षकांना एक आराखडा बनवून देण्यात येईल. त्यानुसार शिक्षकांना प्रशिक्षण आणि माॅकड्रील घेण्यात येईल.
  • पुढे हेच शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत काम करण्याचे प्रशिक्षण देतील. यामध्ये पूरपरिस्थिती, भूकंप, अग्निशमन याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येईल.मुख्यमंत्र्यांची सही झाली तरीही...

सुमारे ७ कोटी रुपयांची तरतूद असलेल्या या प्रोग्रामच्या टेंडरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही झालेली आहे. तरीही या प्रोग्रामची फाईल एक इंचही पुढे सरकलेली नाही. हा प्रकल्प अनेक कारणांमुळे लालफितीत अडकल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


वर्षाअखेरीस प्रकल्प होईल पूर्ण

याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना विचारल्यावर त्यांनी चालू वर्षाच्या अखेरपर्यंत हा प्रोग्राम सुरू होईल, असे सांगितले.


प्रोग्रामचा फायदा काय ?

आपत्तीचा सामना करता यावा यासाठी १,१०० शाळेतील विद्यार्थ्यांना सुरूवातीला प्रशिक्षण देण्यात येईल. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा मुख्य उद्देश म्हणजे हे विद्यार्थी आपल्या पालकांनाही हे प्रशिक्षण देऊ शकतील. महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा प्रकल्प राबविण्यात येत आहे.हेही वाचा -

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अहवाल द्या- राज्यमंत्री

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा- विद्यार्थी संघटनाडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
ताज्या बातम्या