Advertisement

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अहवाल द्या- राज्यमंत्री


विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अहवाल द्या- राज्यमंत्री
SHARES

राज्यातील शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पुरेशा उपाययोजना कराव्यात तसेच या कार्यवाहीचा अहवाल महिन्याभरात शासनास सादर करावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव यांना पत्राद्वारे दिले आहेत.


गंभीर घटनांमध्ये वाढ

गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांमधील विविध अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे रॅगिंग, लैंगिक शोषण, मारहाण, हत्या इत्यादी गंभीर घटनांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थेची असते. परंतु काही शैक्षणिक संस्था महाविद्यालयाचा परिसर, इमारत, वसतीगृह, ग्रंथालय, उपहारगृह इ. ठिकाणी सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना करत नसल्याचे आढळून आले आहे.


अशी करा सुरक्षा व्यवस्था

त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांतील विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी शैक्षणिक संकुलात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, सर्व विद्यार्थ्यांना ओळखपत्र लावून महाविद्यालयात प्रवेश बंधनकारक करणे, योग्य ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे इत्यादी बाबींचा अवलंब करण्यात यावा, अशा सूचनाही राज्यमंत्री वायकर यांनी अपर मुख्य सचिवांना पाठविलेल्या पत्रात नमूद केल्या आहेत.

राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना करण्यात याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल एक महिन्यांत शासनास सादर करण्यात यावा, असे निर्देश वायकर यांनी अपर मुख्य सचिवांना लेखी पत्राद्वारे दिले आहेत.



हेही वाचा -

कांदिवलीतील रायन स्कूलमुळं 'यांच्या' मुलाचं वर्ष वाया

सिग्नल शाळा...इथे उद्याचा भारत घडतो!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा