Advertisement

१०वी, १२वीच्या उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीसाठी परवानगीची मागणी

उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचं रखडलेलं काम सुरू करण्यासाठी आता शिक्षण विभागानं पावलं उचलली आहेत.

१०वी, १२वीच्या उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीसाठी परवानगीची मागणी
SHARES

कोरोना व्हायरसमुळं अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. कोरोनामुळं वार्षिक परीक्षा रखडली असली विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अनेक निर्णय शिक्षण मंडळाकडून घेण्यात आले आहेत. तसंच, दहावी व बारावीच्या परीक्षांच्या निकालावर कोरोनाचं सावट आहे. राज्यात लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी १२वीच्या परीक्षा झाल्या. तसंच लॉकडाऊनच्या काळात दहावीचा एक पेपर म्हणजे भूगोलाचा पेपर राहिला. मात्र, कोरोनाचा प्रादु्र्भाव लक्षात घेता हा पेपर रद्द करण्यात आला. असं असलं तरी विद्यार्थ्यांना निकालाची चिंता आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचं रखडलेलं काम सुरू करण्यासाठी आता शिक्षण विभागानं पावलं उचलली आहेत. 

१०वी व १२वीच्या उत्तरपत्रिकांची ने-आण करण्यासाठी शिक्षकांना परवानगी देण्याची मागणी विभागाने केली आहे. लॉकाडाऊन काहीसा शिथिल केल्यानंतर आता या उत्तरपत्रिकांच्या तपासणीसाठी विभागानं पाऊल उचलले आहे. उत्तरपत्रिकांची ने-आण करण्यासाठी शिक्षकांना प्रवासाची परवानगी देण्याची विनंती शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी सर्व महापालिका आयुक्तांना केली आहे.

बारावीची सर्व विषयांची परीक्षा लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी झाली होती. त्यामुळं उत्तरपत्रिकांचं वितरणही झालं होतं. परीक्षकांकडं उत्तरपत्रिका पोहोचल्या असल्यामुळं बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचं काम आटोक्यात आहे.

दरम्यान, परीक्षा झाल्या असल्या तरी निकाला बाकी आहे. त्याचप्रमाणं निकालाकरीता उत्तरपत्रिकांचं मुल्यांकन होणं गरजेचं आहे. परंतु, ते अद्याप झालेलं नाही. त्यामुळं १०वीच्या पेपरच्या मुल्यांकनासाठी एका शिक्षकाला एक क्लासरूम अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुंबई लाइव्हला दिली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा