Advertisement

कला संचालनालय प्रवेशप्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

प्रवेशाच्या निकषासंदर्भात अधिक माहितीसाठी www.doa.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

कला संचालनालय प्रवेशप्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर
SHARES

कला संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष २०२०–२१ साठी वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. प्रथम वर्ष पदविका/प्रमाणपत्र कला विषयक अभ्यासक्रम (मूलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षण, आर्ट मास्टर) प्रवेशासाठीचं वेळापत्रक असणार आहे. विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार https://cetcell.net/doa/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचे आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशाचे दिलेले निकष, नियम प्रक्रिया आणि सूचना यांचं काळजीपूर्वक वाचन करावं. प्रवेशाच्या निकषासंदर्भात अधिक माहितीसाठी  www.doa.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. (maharashtra state directorate of art declares new timetable of admission)

मूलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षण व आर्ट मास्टर या पदविका /प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवाराद्वारे संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणं, महाविद्यालय व अभ्यासक्रम निवडणं, कागदपत्रांच्या स्कॅन छायांकीत प्रती अपलोड करणं यासाठी २० सप्टेंबर ते ३० सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या निवड याद्या ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या निवड यादीबाबत काही तक्रार असल्यास ६ ऑक्टोबर रोजी सादर करता येतील. ८ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांसाठी अंतिम निवड यादी प्रसिद्ध होणार आहे. संबंधित महाविद्यालयात ९ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत प्रवेश घेता येणार असल्याचं कला संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविलं आहे.


हेही वाचा-

Final Year Exams: एटीकेटीच्या परीक्षा २५ सप्टेंबरपासून

मुदतवाढीचा फायदा, ‘इतक्या’ विद्यार्थ्यांनी केली सीईटीसाठी नोंदणी


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा