Advertisement

मुदतवाढीचा फायदा, ‘इतक्या’ विद्यार्थ्यांनी केली सीईटीसाठी नोंदणी

सामाईक प्रवेश परीक्षांसाठी नव्याने नोंदणी सुरू केली होती. या वाढीव कालावधीचा लाभ ४८ हजार ६३४ विद्यार्थ्यांना झाला आहे.

मुदतवाढीचा फायदा, ‘इतक्या’ विद्यार्थ्यांनी केली सीईटीसाठी नोंदणी
SHARES

विद्यार्थी आणि पालकांच्या विनंतीचा विचार करता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांनी विविध सामाईक प्रवेश परीक्षांसाठी नव्याने नोंदणी सुरू केली होती. या वाढीव कालावधीचा लाभ ४८ हजार ६३४ विद्यार्थ्यांना झाला आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. (MH CET students benefited after maharashtra government extends registration date for exam)

उदय सामंत म्हणाले, कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी विविध सामाईक प्रवेश परीक्षांसाठी अर्ज भरू शकले नव्हते. याबद्दल विद्यार्थी आणि पालकांची मागणी लक्षात घेता राज्य सीईटी सेल’ने दोन दिवसांचा कालावधी वाढविला होता. ७ व ८ सप्टेंबर २०२० असा हा दोन दिवसीय वाढीव कालावधी होता. ज्याचा लाभ हजारो विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलने एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा नुकत्याच जाहीर केल्या आहेत. परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र सेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.

हेही वाचा - एमएचटी-सीईटी परीक्षेच्या 'या' आहेत नवीन तारखा

सुधारित तारखा

१) पीसीबी ग्रुप – १, २, ४, ५, ६, ७, ८, ९ ऑक्टोबर २०२०

२) पीसीएम ग्रुप – १२, १३, १४, १५, १६, १९, २० ऑक्टोबर २०२०

परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक हे सेलच्या www.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना या वेबसाईटवरुन डाऊनलोड करता येणार आहे. 

या वाढीव कालावधीमध्ये विविध विद्या शाखांच्या सामाईक प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये

 • एम.पी.एड. – ३२५
 • बी.पी.एड. – १२६५
 • बी.एड. – १६७१५
 • एम.एड. – ६७७
 • एल.एल. बी.(तीन वर्ष ) – १२०१०
 • एल.एल. बी.(पाच वर्ष ) – ४०६७
 • बी.एड. – एम.एड. – ६४९
 • बी.ए./बी.एस्सी बी.एड. – ११२३
 • एम.सी.ए. – १८९०
 • बी.एच.एम.सी.टी. – ३६१
 • एम.एच.एम.सी.टी. – ३७
 • एम. आर्किटेक्चर– २८७
 • एम.एच.टी.सी.ई.टी. – ९२२८

या अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. असंही उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं.

Read this story in English
संबंधित विषय