Advertisement

सीईटी अर्ज प्रक्रियेला २ दिवसांची मुदतवाढ

सामाईक प्रवेश परीक्षेच्या (CET) अर्ज प्रक्रियेस राज्य सरकारने दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ८ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील.

सीईटी अर्ज प्रक्रियेला २ दिवसांची मुदतवाढ
SHARES

सामाईक प्रवेश परीक्षेच्या (CET) अर्ज प्रक्रियेस राज्य सरकारने दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ८ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. ज्यांना कोरोनाच्या संकटामुळे आतापर्यंत या परीक्षेसाठी अर्ज सादर करता आले नाही, अशा हजारो विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे मुदतवाढ देण्यासंदर्भात मागणी केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. (2 days extension for CET application process in maharashtra)

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेचे अर्ज दिलेल्या मुदतीत भरता आले नाहीत. यासंदर्भात राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी  विद्यार्थ्यांची अडचण समजून घेत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून अर्ज भरण्यास मुदत वाढ देण्याची विनंती केली होती. त्यानुसार  उच्च व तंत्र शिक्षण विभागाची बैठक घेण्यात आली.  विद्यार्थी हिताच्या या मागणीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी मंजूरी देत बैठकीतच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तांना कालावधी वाढविण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षांकरीता (सीईटी) अर्ज भरण्यासाठी ७ व ८ सप्टेंबर, २०२०  असे दोन दिवस एक विशेष बाब म्हणून संधी देण्यात आली आहे. यासंदर्भात राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.


हेही वाचा - 

अंतिम वर्षाच्या परीक्षांचा आराखडा ७ सप्टेंबरपर्यंत सादर करा, सरकारचे विद्यापीठांना निर्देश

राज्यातील सर्व CET परीक्षा ऑक्टोबरमध्ये, 'या' तारखेवर होऊ शकते शिक्कामोर्तब

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा