Advertisement

अंतिम वर्षाच्या परीक्षांचा आराखडा ७ सप्टेंबरपर्यंत सादर करा, सरकारचे विद्यापीठांना निर्देश

अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांनी ७ सप्टेंबरपर्यंत आपापला आराखडा सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

अंतिम वर्षाच्या परीक्षांचा आराखडा ७ सप्टेंबरपर्यंत सादर करा, सरकारचे विद्यापीठांना निर्देश
SHARES

अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांनी ७ सप्टेंबरपर्यंत आपापला आराखडा सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्यातील कृषी-अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू यांच्यात झालेल्या बैठकीनंतर सरकारने विद्यापीठांना हे निर्देश दिले आहेत. 

राज्यपालांसोबत झालेल्या बैठकीत विद्यापीठांच्या अव्यावसायिक शाखांमध्ये अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेऊन ३१ आॅक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचं ठरवण्यात आलं आहे. शिवाय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून त्यांना घरातूनच परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याला राज्यपालांनी देखील मंजुरी दिली आहे. 

अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राजभवन इथं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कृषी, अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची ऑनलाईन बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत,  राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, परीक्षेसंदर्भात गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर उपस्थित होते.

हेही वाचा- अंतिम वर्षाच्या परीक्षा घरूनच, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा

सर्वोच्च न्यायालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांनुसार १५ सप्टेंबरपासून सुरू करून ३१ ऑक्टोबरपर्यंत निकालासह परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसंच समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषद आणि विद्यापीठाच्या परीक्षा मंडळासमोर ठेवून २ दिवसात शासनास कळवावं आणि राज्य आपत्कालीन प्राधिकरणाची बैठक मंगळवारी घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करावी अशी सूचना राज्यपालांनी केली.

परीक्षा पद्धतीसंदर्भात विद्यापीठांनी व्यवस्थापन परिषद आणि परीक्षा मंडळामध्ये परीक्षेसंदर्भात गठित केलेल्या समितीचा अहवाल सादर करून परीक्षा पद्धती निवडावी, असंही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितलं.

राज्यपालांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) ३० सप्टेंबर २०२० पर्यंत परीक्षा घेण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत. यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठवून राज्यातील कोविड-१९ ची सद्याची परिस्थिती आणि परीक्षेसंदर्भातील नियोजन कळविण्यात येईल. असंही उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं.

या बैठकीत विद्यापीठांनी परीक्षा प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, पुढील शैक्षणिक वर्ष लवकर सुरू करण्या संदर्भातील तयारी पूर्ण करावी. या बरोबरच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची प्रक्रिया वेळेत पूर्ण करुन अपवादात्मक परिस्थितीमध्ये विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला तर अशा विद्यार्थांच्या परीक्षेचंसुद्धा नियोजन करण्यात यावं. या संदर्भात चर्चा करण्यात आली.

हेही वाचा- दहावी आणि बारावीची ऑक्टोबरमध्ये होणारी फेरपरीक्षा रद्द

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा