Advertisement

एमएचटी-सीईटी परिक्षेच्या 'ह्या' आहेत नवीन तारखा

परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र सेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.

एमएचटी-सीईटी परिक्षेच्या 'ह्या' आहेत नवीन तारखा
SHARES

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलने एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र सेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.

सुधारित तारखा

१) पीसीबी ग्रुप – १, २, ४, ५, ६, ७, ८, ९ ऑक्टोबर २०२०
२) पीसीएम ग्रुप – १२, १३, १४, १५, १६, १९, २० ऑक्टोबर २०२०

परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक हे सेलच्या www.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना या वेबसाईटवरुन डाऊनलोड करता येणार आहे. 

महाराष्ट्र सरकारच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या MHT-CET अर्थात अभियांत्रिकी प्रवेश पूर्व परीक्षेसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर MHT-CET परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयानं त्यावरून याचिकाकर्त्यांना फटकारत मागणी फेटाळून लावली होती.



हेही वाचा -

Mumbai University Exam मुंबई विद्यापीठाचा अंतिम वर्षाच्या परीक्षेचा पॅटर्न जाहीर

२१ सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याचा केंद्राचा निर्णय



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा