Advertisement

२१ सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याचा केंद्राचा निर्णय

केंद्र सरकारनं २१ सप्टेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याचं जाहीर केलं आहे. पण या निर्णयाला पालकांचा विरोध होण्याची शक्यता आहे.

२१ सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याचा केंद्राचा निर्णय
SHARES

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. अनलॉक मोहीमेअंतर्गत हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. अशातच केंद्र सरकारनं २१ सप्टेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याचं जाहीर केलं आहे. पण या निर्णयाला पालकांचा विरोध होण्याची शक्यता आहे.

गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून सुरू असलेल्या या लॉकडाऊनमध्ये शाळा, रेल्वे आणि इतर महत्त्वपूर्ण संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता हळूहळू विविध सेवा पूर्ववत केल्या जात आहेत. या अंतर्गत आता शाळा देखील सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी जाता येणार आहे. पण यासोबतच विद्यार्थ्यांना पालकांच्या परवानगीचं पत्र आवश्यक असणार आहे. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जाणार आहेत. इतर इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन आणि डिस्टन्स लर्निगला परवानगी देण्यात आली आहे.  

केंद्रानं जरी ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी परवानगी दिली असली तरी किती राज्य यासाठी तयार होतील हे सांगणं कठिण आहे. दिल्ली, हरयाणा, बिहार या राज्यांनी शाळा सुरू करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. मात्र महाराष्ट्रात हा निर्णय राज्य सरकारच्या हातात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शाळा सुरू होणार की नाही हे स्पष्ट नाही. 

खालील नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे.  

  • कंटेन्मेंट झोनव्यतिरिक्त इतर शाळा खुली करण्याची परवानगी असेल. त्यामुळे कंटेन्मेंट झोनमध्ये राहणारे विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेत जाण्याची परवानगी नसेल.
  • शाळांमध्ये कोणतीही अॅक्टीव्हिटी सुरू करण्यापूर्वी यामध्ये वर्ग, प्रयोगशाळा, सर्वजण वावरत असल्याचा परिसरात १ टक्के सोडिअम हायपोक्लोराइट सॉल्यूशननं सॅनिटाइज करावा.
  • सातत्यानं स्पर्श होणाऱ्या भागात वारंवार सॅनिटायजेशन करावं
  • शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग (५० टक्क्यांपर्यंत) यांना शाळांमध्ये ऑनलाइन टिचिंग किंवा टेली काऊन्सिलींग वा इतर कामांसाठी बोलावण्यात येईल.
  • प्रत्येक वेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणं अनिवार्य असेल.
  • दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फूट अंतर असावं, त्यामुळे शाळांमध्ये बसण्याची रचना कोरोनाच्या नियमांनुसार करावी.



हेही वाचा

ऑनलाईन शिक्षणावर शिक्षकांसाठी निबंध स्पर्धा

MPSC परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा