Advertisement

ऑनलाईन शिक्षणावर शिक्षकांसाठी निबंध स्पर्धा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शालेय शिक्षण ऑनलाईन चालू आहे.या शिक्षणाचे फायदे आहेत तसे तोटेही सर्वांना जाणवत आहेत. सर्वच शिक्षकांच्या मनात अनेक प्रश्न, समस्या आहेत त्यावर त्यांनी स्वतःच काढलेले उपायही आहेत.

ऑनलाईन शिक्षणावर शिक्षकांसाठी निबंध स्पर्धा
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शालेय शिक्षण ऑनलाईन चालू आहे.या शिक्षणाचे फायदे आहेत तसे तोटेही सर्वांना जाणवत आहेत. सर्वच शिक्षकांच्या मनात अनेक प्रश्न, समस्या आहेत त्यावर त्यांनी स्वतःच काढलेले उपायही आहेत. शिक्षकांच्या मनातील विचार लेखणीबद्ध होऊन सर्वांना समजावेत या विचाराने मुंबई महानगरपालिका शिक्षक शिक्षकेतर सेनेने मुंबईतील सर्व भाषिक शाळेतील शिक्षकांसाठी निबंध स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेचा ऑनलाईन पारितोषिक वितरण सोहळा ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून गूगल मिटवरून संपन्न झाला.  

कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रावर झालेला परिणाम व उपाय योजना, लॉकडाऊननंतर अध्यापनाचे नियोजन कसे कराल?, ऑनलाइन शिक्षणाचे फायदे व तोटे, मराठी शाळा टिकविण्यासाठी उपाययोजना असे निबंध स्पर्धेचे विषय होते. यामध्ये ९५ शिक्षक सहभागी झाले होते.  

शहर विभाग निकाल

प्रथम क्रमांक - संदेश धोंडू कदम

शाळा- छबिलदास लल्लूभाई प्राथमिक शाळा,दादर

द्वितीय क्रमांक - कविता शशिकांत खंडागळे

शाळा - अभिनव प्राथमिक शाळा,दादर(पू)

तृतीय क्रमांक - सविता विजय यादव

शाळा - City of Los Angeles Mun school, U P school

उतेजनार्थ

४) प्रणाली पांडुरंग गोठणकर

शाळा- सोशल सर्वीस लीग,प्राथमिक शाळा परेल

५)शुभदा प्रविण अघोर - विशेष ज्येष्ठ शिक्षिका

शाळा -विजय शिक्षण संस्थेचे प्रगती विद्यालय,कर्णबधिरांसाठी,दादर(प)

पश्चिम उपनगर निकाल

प्रथम क्रमांक - भारती गणेश खाडे

शाळा - विद्याविकास मंडळ प्राथमिक शाळा,अंधेरी(प)

द्वितीय क्रमांक - वीणा संजय मकवाना

शाळा - बी.एल.रुईय्या हायस्कूल,प्राथमिक विद्यालय,विलेपार्ले(पू)

तृतीय क्रमांक - शुचिता मनिष राणे

शाळा - सु.प्र.संघाचे मनोहर हरिराम चोगले विद्यालय,बोरिवली(प)

उतेजनार्थ

४) मनिराम यादव

शाळा - ज्ञानोदय विद्यामंदिर हिंदी प्राथमिक  विद्यालय,कुरारगाव ,मालाड

५) सुनीता मोहन धीवार

शाळा - पार्ले टिळक विद्यालय,प्राथमिक शाळा ,विलेपार्ले

 मुंबईतून प्रथम ५ क्रमांक

प्रथम क्रमांक - उमाकांत वसंतराव जगताप

शाळा - प्रा.डॉ.एन. डी.पाटील विद्यालय,सह्याद्रीनगर,कांदिवली(प)

द्वितीय क्रमांक - विकास लक्ष्मण धात्रक

शाळा - शारदाश्रम विद्यामंदिर,मराठी प्राथमिक विभाग,भवानी शंकर रोड,दादर,

तृतीय क्रमांक - सुनीती सुनील पेढामकर

शाळा -पराग विद्यालय,भांडुप(प)

उतेजनार्थ 

४)सविता रामचंद्र धुमाळे

शाळा - जवाहर विद्याभवन,प्राथमिक मराठी शाळा,चेंबूर,

५) साधना जितेंद्र म्हात्रे - चित्रकला शिक्षिका

शाळा - शिक्षणरत्न प्रदीप द.सामंत विद्यालय,कुर्ला(पू)

यावेळी निबंध स्पर्धेच्या निमित्ताने मनातील विचार मांडण्यासाठी शिक्षक सेनेने एक व्यासपीठ दिले असे मनोगत शिक्षक प्रतिनिधी म्हणून शुभदा अघोर यांनी व्यक्त केले. पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त अशी स्पर्धा घ्यावी अशी संकल्पना युनियनचे सरचिटणीस राजेंद्र संपत घाडगे यांनी मांडली व ती पूर्णत्वास नेली. निबंध स्पर्धेचे  संपूर्ण जबाबदारी सेनेच्या पदाधिकारी, वांद्रे विभाग संघटक शिल्पा अष्टमकर यांनी पूर्ण केली. त्यांना मार्गदर्शन व सहकार्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष के.पी.नाईक यांनी केले. या स्पर्धेला विधानसभेचे आमदार मंगेश सातमकर, विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे, पालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा अंजली नाईक,  सिनेकलाकार हार्दिक जोशी यांची विशेष उपस्थिती होती.



हेही वाचा -

मुंबईत अतिदक्षता खाटांची कमतरता

लोकल ट्रेन सुरू झालीच पाहिजे! विरार स्थानकात प्रवाशांचा उद्रेक



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा