Advertisement

MPSC परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर

आयोगामार्फत एप्रिल/मे २०२० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन परीक्षा कोरोना लाॅकडाऊनमुळे पुढे ढकलल्या होत्या. यावेळी नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या.

MPSC परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर
SHARES

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने ३ परिक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. यानुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा – ११ ऑक्टोबर २०२०, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-२२ नोव्हेंबर २०२० व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा – १ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहेत. आयागाने याबाबतचं परिपत्रक जाहीर केलं आहे.

आयोगामार्फत एप्रिल/मे २०२० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन परीक्षा कोरोना लाॅकडाऊनमुळे पुढे ढकलल्या होत्या. यावेळी नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी न झाल्याने पुन्हा एकदा आयोगाने या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

सर्वात आधी नियमित वेळापत्रकानुसार एमपीएससी पूर्व परीक्षा ५ एप्रिल २०२० रोजी होणार होती. ही परीक्षा पुढे ढकलण्यात येऊन १३ सप्टेंबर २०२० रोजी आयोजित करण्याचे निश्चित झाले होते. मात्र १३ सप्टेंबरलाच नॅशनल एलिजीबीलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे एमपीएससी पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर ऐवजी रविवार २० सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात येणार, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता पूर्व परीक्षाच नव्हे तर या दरम्यानच्या काळातील एमपीएससीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

आयोगाने नवीन सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार आता आता राज्यसेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २२ नोव्हेंबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबरला होणार आहे.



हेही वाचा -

IPL २०२० चं वेळापत्रक जाहीर, मुंबई-चेन्नईत ‘या’ दिवशी ओपनिंग मॅच

मुलुंडमधील मसाले व्यापाऱ्याच्या मुलाचे सिनेस्टाइल अपहरण, पुण्यातून चौघांना अटक



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा