Advertisement

मराठी भाषा गौरव दिन : राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये साजरा

मुंबईसह राज्यभरातील सर्व विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, तसेच खासगी, अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालये आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात येत आहे.

मराठी भाषा गौरव दिन : राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये साजरा
SHARES
मुंबईसह राज्यभरातील सर्व विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, तसेच खासगी, अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालये आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात येत आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातुन  विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येत आहे.

उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत याबाबत निवेदन केले. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठे, शासकीय, अशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, तसेच मॉडेल पदवी महाविद्यालये व परिसंस्था, कला संचालनालय व त्या अधिपत्याखालील कार्यालये तसेच तंत्र शिक्षण संचालनालय, त्या अधिपत्याखालील अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्र निकेतने व तत्सम शैक्षणिक संस्था यामध्ये विविध उपक्रम आयोजित करून समारंभपूर्वक मराठी भाषा गौरव दिन सोहळा साजरा करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांनी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येत आहे. लोक साहित्य-उत्सव मराठीचा ही यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. 

त्याशिवाय, लोकसाहित्याचा प्रचार व प्रसाराकरिता विविध स्पर्धाचे आयोजन करणे, पुस्तके व कोश याबाबत चर्चा, परिसंवाद, व्याख्याने इत्यादी उपक्रम राबवावेत, अशा सूचना देण्यात आल्या असून, त्यानुसार उपक्रम राबविले जात आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा