Advertisement

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

येत्या १९ एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या
SHARES

येत्या १९ एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा येत्या जूनमध्ये घेण्यात येणार आहेत. या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

'महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.  या परीक्षा पुढे ढकलणेबाबत बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे', असे ट्वीटही अमित देशमुख यांनी केले आहे.

'या परीक्षा पुढे ढकलणेबाबत बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे', असंही त्यांनी म्हटलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा