Advertisement

एमएचटी सीईटी यंदा १० राज्यांमध्ये होणार

एमएचटी सीईटी परीक्षा यंदा दहा राज्यांमध्ये होणार आहे. त्यामुळे आता या परीक्षेसाठी अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात येण्याची गरज भासणार नाही.

एमएचटी सीईटी यंदा १० राज्यांमध्ये होणार
SHARES

एमएचटी सीईटी परीक्षा यंदा दहा राज्यांमध्ये  होणार आहे. त्यामुळे आता या परीक्षेसाठी अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात येण्याची गरज भासणार नाही. राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्ष (सीईटी सेल) ने एमएचटी सीईटी परीक्षेचा बाहेरील विद्यार्थ्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. 

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी सीईटी परीक्षा घेण्यात येते. यंदा ही परीक्षा १३ ते २३ एप्रिल या कालावधीत होणार आहे. या परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. भारतासह जगभरातील अनेक देशांमधील विद्यार्थी एमएचटी सीईटी परीक्षा देत असतात. त्यामुळे विविध राज्यांतील विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी महाराष्ट्रात यावे लागत असे. या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. गेल्या वर्षी राज्याबाहेरच्या १६ हजार विद्यार्थ्यांनी रीक्षा दिली होती. यंदा या विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यांमध्येच परीक्षा देण्याची संधी देण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे.

कर्नाटक, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, प. बंगाल, तमिळनाडू या राज्यांमध्ये परीक्षेचे एक केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये हे परीक्षाकेंद्र असेल. इतर राज्यात परीक्षा घेतल्यामुळे महाराष्ट्रातील परीक्षेचा कालावधी एक ते दोन दिवसांनी कमी होण्याची शक्‍यता सीईटी सेलच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. एमएचटी सीईटीचा अर्ज विद्यार्थ्यांना कमी वेळेत भरता यावा यासाठी दरवर्षी असणारी आधाराची सक्‍ती काढून टाकण्यात आली आहे. तर अर्जात दोन वेळा भरावा लागणारा पत्ता आता एकदाच भरावा लागणार आहे.  एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २९ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.


हेही वाचा  -

दाऊदचा हस्तक गँगस्टर एजाज लकडावालाला अटक




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा