दाऊदचा हस्तक गँगस्टर एजाज लकडावालाला अटक

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी पाटणा विमानतळावरुन अटक केली आहे.

  • दाऊदचा हस्तक गँगस्टर एजाज लकडावालाला अटक
SHARE

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी पाटणा विमानतळावरुन अटक केली आहे. लकडावालाची अटक हे मुंबई पोलिसांचं मोठं यश मानलं जात आहे. त्याला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन लकडावालाला अटक केल्याची माहिती दिली. 

 मुंबई पोलिसांच्या वॉण्टेड यादीत एजाज लकडावाला होता. २७ प्रकरणात एजाज लकडावाला गुन्हेगार आहे. यामध्ये हत्या, खंडणी सारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. बँकॉकमध्ये २००३ मध्ये एका हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला अशी अफवा पसरली होती. मात्र या हल्ल्यात तो वाचला होता. यानंतर तो बँकॉकहून कॅनडाला गेला होता. अनेक वर्षापासून तो कॅनडात राहत होता. छोटा राजनला साथ दिल्याने दाऊद इब्राहिम लकडावाला याच्यावर नाराज झाला होता. 

  ६ महिन्यापासून आमची टीम त्याला पकडण्यासाठी सापळे लावत होती. त्याच्या मुलीला अटक केल्यानंतर या तपासाला वेग आला होता. २००८ साली छोटा राजनच्या टोळीपासून वेगळे झाल्यानंतर तो कॅनडा, मलेशिया या देशात राहत असल्याची माहिती आम्हाला मिळत होती.  २००८ नंतर किती वेळा तो भारतात आला आणि कशासाठी आला होता हे तपासनंतर स्पष्ट होईल. 

 संतोष रस्तोगी,  सहआयुक्त (गुन्हे) 

याआधी मुंबई विमानतळावर एजाज लकडावालाच्या मुलीला अटक करण्यात आली आहे. सोनिया मनीष अडवाणी या नावाने बनावट पासपोर्टच्या आधारे ती देशाबाहेर पळून जात होती. तिची चौकशी केली असता एजाज लकडावालासंबंधी माहिती उघड झाली होती. बिहार पोलिसांच्या टीमची मदत घेऊन पटना विमानतळावर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. ८ जानेवारीला रात्री ९ वाजता एजाज लकडावालाला अटक करण्यात आली आणि त्याला लगेच मुंबईत आणण्यात आल्याचं सहआयुक्त (गुन्हे) संतोष रस्तोगी यांनी सांगितलं. 

एजाज लकडावालाची मुलगी


हेही वाचा -

अक्षय कुमारच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला

वांद्रे-वरळी सी-लिंकवर रुग्णवाहिकेची आवश्यकता - उच्च न्यायालय

संबंधित विषय
ताज्या बातम्या