
एका वादग्रस्त जाहिरातीमुळे प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अक्षय एका जाहिरातीत मावळ्याच्या वेशात करत असलेल्या जाहिरातीवरून हा वादंग निर्माण झाला आहे. या प्रकरणी शिवप्रेमींनी वरळी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. तर मनसेने गुरूवारी अक्षयकुमारच्या घराबाहेर निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे अक्षय कुमारच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
हेही वाचाः- रेल्वे रुळाला तडा; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
अक्षयकुमार याने 'निरमा' पावडरच्या जाहिरातीमधून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांचा वेश करत ही जाहिरात केली आहे. या जाहिरातील दृश्याने शिवप्रेमीच्या भावना दुखावना गेल्या असून मनसेने ही या जाहिरातीवर आक्षेप घेतला. या प्रकरणी वरळीतील शिवप्रेमींनी संबधीत जाहिरातीमध्ये अक्षय कुमार हा मावळ्याच्या भूमिकेमध्ये आहे. जाहिरातीमध्ये करण्यात आलेलेल चित्रण आक्षेपार्ह असल्याचे वरळी पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. कंपनीच्या उत्पादनावर बहिष्कार टाकत असून निरमा कंपनीवर योग्य कारवाई करण्यात यावी, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे. तर दुसरीकडे मनसेने गुरूवारी दुपारी अक्षयकुमारच्या घराबाहेर निदर्शने करण्याच इशारा दिला आहे. त्यामुळे स्थानिक पोलिस ठाण्याकडून अक्षयच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला आहे.
