Advertisement

रेल्वे रुळाला तडा; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

टिटवाळा-खडवली स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

रेल्वे रुळाला तडा; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
SHARES

टिटवाळा-खडवली स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास रेल्वे रुळाला तडा गेला असून, मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या गाड्यांवर परिणाम झाला आहे. सकाळी गर्दीच्या वेळेस रुळाला तडा गेल्यानं कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना लेट मार्कचा सामना करावा लागत आहे.

वाहतूक ठप्प

मध्य रेल्वेच्या कसारा-कल्याण मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक ठप्प झाल्यानं कल्याण ते कसारा दरम्यानच्या स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी जमली आहे. तसंच, वासिंग, खडवली, आसनगांव या स्थानकात अनेक लोकल रखडल्या आहेत.

दुरूस्तीचं काम

याबाबत माहिती मिळताच मध्य रेल्वे प्रशासनानं दुरूस्तीचं काम हाती घेतलं आहे. दुरूस्तीचं काम सुरू असल्यामुळं कल्याण-कसारा मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर येण्यास वेळ लागणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा