Advertisement

शाळा, काॅलेजच्या अग्नीसुरक्षा ऑडिटची मागणी


शाळा, काॅलेजच्या अग्नीसुरक्षा ऑडिटची मागणी
SHARES

मुंबईतील कमला मिल परिसरातील हॉटेलला आग लागल्यानंतर मुंबईतील शाळा काॅलेजमधील अग्निशमन सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत मुंबईसह राज्यातील सर्व शाळा काॅलेजांच्या इमारतींचं अग्नीसुरक्षा परीक्षण करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. संबंधित मागणीसाठी मनविसेचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे.

सन २००४ मध्ये तामिळनाडूतील कुंभकोणम येथील शाळेला आग लागल्याने ९४ मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शाळा काॅलेजातील अग्नीसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या संबधी २००९ मध्ये शासनाने शाळा काॅलेजांना तसे निर्देशही दिले होते. त्या अनुषंगाने सर्व शाळा आणि काॅलेजात हे बंधनकारक केलं आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचीही अनेक शिक्षणसंस्था अंमलबजवणी करत नसल्याचं निदर्शनास आल्याची माहिती मनविसेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांनी दिली.


संस्थाचालकांकडून नियम धाब्यावर

अग्नीसुरक्षा व अग्नीप्रतिबंधक बाबींची तपासणी जून, जुलै मध्ये करून त्याचा तपासणी अहवाल संबंधित अग्निशमन दलाला सादर करण्याचे नियम आहेत. मात्र शिक्षणसंस्थाचालक विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रश्नी उदासीन असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे या संबंधित आदेश शाळा व काॅलेजांना काढावे, असे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा