Advertisement

राज्यात 'नीट'ची केंद्र वाढवली जाणार


राज्यात 'नीट'ची केंद्र वाढवली जाणार
SHARES

मुंबई - 'नीट' परीक्षेची केंद्र वाढवण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय परिषदेच्या शिष्टमंडळाने सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी देशभरात केंद्रीय सामाईक प्रवेश प्रक्रिया अर्थात 'नीट' परीक्षा घेतली जाते. मे महिन्यात ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यात केवळ सहा केंद्र आहेत. त्यामुळे लांबचं अंतर गाठून परीक्षा केंद्रावर येणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा त्रास होणार आहे. त्यामुळे महाजन यांनी राज्यात नीटची केंद्र वाढवण्यात येतील असं आश्वासन या वेळी दिल्याचं एबीव्हीपीचे मुंबई महानगर मंत्री रोहित चांदोडे यांनी सांगितले. त्यांच्या या आश्वासनामुळे आता केंद्रांची संख्या वाढेल आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल असेही चांदोडे म्हणाले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा