सीएच्या परीक्षेत भिवंडीच्या पियूषचं उज्ज्वल यश!

 Pali Hill
सीएच्या परीक्षेत भिवंडीच्या पियूषचं उज्ज्वल यश!

मुंबई - 'इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंट्स आॅफ इंडिया'ने गेल्या नोव्हेंबरमध्ये घेतलेल्या सीएसाठीच्या अंतिम परीक्षेत भिवंडीतील पियूष रमेश लोहियाने महाराष्ट्राचा झेंडा फडकावला आहे. 71.75 टक्के गुण मिळवून पियूषने संपूर्ण देशात दुसरा क्रमांक पटकावला.

पियूषने दोन्ही ग्रुपमधील आठही विषयांची परीक्षा देऊन 800 पैकी 574 गुण मिळवले. देशभरातील 382 केंद्रांवर एकूण 74 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. देशात 7 हजार 192 विद्यार्थ्यांनी सीएची परीक्षा पास केली. "चुलत भावंडांकडून 'सीए' करण्यासाठी प्रेरणा मिळाली. दिवसाला १२ तास अभ्यास करत होतो. नियोजन करून अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते," अशा भावना पियूषने व्यक्त केल्या.

Loading Comments