Advertisement

मुंबईत बुधवारपासून १ली ते ७वीच्या शाळा होणार सुरू

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानं राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार बुधवार १५ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार आहेत.

मुंबईत बुधवारपासून १ली ते ७वीच्या शाळा होणार सुरू
(Representational Image)
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतू, आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानं राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार बुधवार १५ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार आहेत.

ऑमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, अखेर शाळा सुरु होण्याबाबतची महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

ऑमिक्रॉनमुळं पालकांचा पाल्यांना शाळेत पाठवण्यास नकार आहे. शाळा नवीन वर्षात सुरु करण्यात याव्यात, अशी त्यांनी मागणी केली होती. शाळांकडून सूचना न मिळाल्याने पालक संभ्रमात होते. मात्र यावर आता महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी याबाबत स्पष्ट केलं आहे.

मुंबईत बुधवारपासून १ली ते ७वीच्या शाळा सुरू होणार आहेत. याबाबत शाळांच्या मुख्याध्यापकांना मुंबई महापालिकेचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. बुधवारपासून म्हणजे १५ डिसेंबरपासून १ली ते ७वीचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शाळेच्या मुख्याध्यापकांना मुंबई महापालिकेनं तसे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मात्र शाळा सुरू होण्यास एक दिवस शिल्लक असताना शाळांकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाही. त्यामुळं पालकवर्गात संभ्रमाचे वातावरण आहे.

राज्यात ऑमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आला आहे. तर, पालकांच्या मनातही ऑमिक्रॉनविषयी भीतीचे वातावरण आहे.

प्रशासनाकडून पाऊलं उचलली जात आहेत. १ डिसेंबरपासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनेक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. पण शहरातील शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

आता शहरातील शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येत आहेत. मुंबईतील प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय महापालिकेनं ३० नोव्हेंबर रोजीच घेतला होता. १५ डिसेंबरपासून १ली ते ७वीचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिल्या आहेत.

त्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमावली देखील जाहीर करण्यात आली होती. मात्र शाळा सुरू होण्यास एक दिवस बाकी असताना शाळांकडून कोणत्याही सूचना देण्यात न आल्यानं पालकवर्गात संभ्रम निर्माण झाला आहे. पण शाळा सुरू करण्याच्या तारखेत कोणताही बदल करण्यात आला नसून १५ डिसेंबरपासूनच शाळा सुरू होतील असं तडवी यांनी सांगितलं आहे.

औरंगाबाद शहरातील देखील इयत्ता १ली ते ७वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याची तयारी झाली आहे. २० डिसेंबरपासून शहरातील शाळा सुरू करण्याचे निर्देश महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले आहेत. याबाबतचा निर्णय सोमवारी घेण्यात आला आहे.

मार्गदर्शक सूचना

 • कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करून इयत्ता १ली ते इयत्ता ७वी पर्यंतच्या शाळा सुरू कराव्यात.
 • महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांमधील इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी पर्यंतचे वर्ग दिनांक १५ डिसेंबरपासून सुरु करावेत व त्याकरिता संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेमध्ये उपस्थित रहावे.
 • शाळा सुरु करण्याच्या पूर्व तयारीकरिता संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेमध्ये कोव्हीड-१९ नियमांचे पालन करुन आवश्यकतेनुसार उपस्थित ठेवण्याची कार्यवाही संबंधित मुख्याध्यापकांनी करावी.
 • शाळा सुरु करण्यापूर्वी व शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचना सोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट अ व व नुसार कार्यवाही करण्यात यावी.
 • मा. सहाय्यक आयुक्त यांच्या सहाय्याने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मनपा शाळांचे सोडीयम हायराइड द्रावणानं निर्जतुकीकरण करून घेण्यात यावे.
 • इतर व्यवस्थापनांच्या शाळांनी आपल्या स्तरावर शाळांचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
 • बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी पर्यंतचे वर्ग असलेल्या शाळामधील फोन्हीड लगीकरण केंद्र व गोव्हड विलगीकरण कक्ष मा. सहाय्यक आयुक्त यांच्या सहाय्याने अन्य ठिकाणी स्थलांतरीत करून वापरण्यायोग्य करावे.
 • कोव्हीड सेंटर, रेल्वे स्टेशनवर कोव्हीड लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी तसंच निवडणुक विषयक कामासाठी नेमण्यात आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करुन घ्यावे.
 • बृहन्मुंबई महानगरपालिका अधिपत्याखालील शाळांनी आपल्या शाळांमधील इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी पर्यंतचे वर्ग असलेल्या शाळा नजीकच्या महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्राशी संलग्र कराव्यात.
 • कोणत्याही कारणास्तव जे विद्यार्थी शाळेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून शिक्षण घेऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अथवा शिक्षकमित्र, बालकमित्र पालकमित्र गृहभेटी देणे.
 • यासारख्या माध्यमातून शिक्षण मिळेल याचे शाळा स्तरावर नियोजन व कार्यवाही करावी.
 • कोव्हीड विषयक मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन सर्व पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांनी आपल्या अखत्यारीतील शाळांना नियमित भेटी देऊन तपासणी करावी व याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे.
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा