Advertisement

क्रीडा महोत्सवात मुंबई विद्यापीठाची अजिंक्यपदाची हॅट्रीक

मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या २२ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात मुंबई विद्यापीठाने निर्विवाद वर्चस्व गाजवत ३५० गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे.

क्रीडा महोत्सवात मुंबई विद्यापीठाची अजिंक्यपदाची हॅट्रीक
SHARES

मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या २२ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात मुंबई विद्यापीठाने निर्विवाद वर्चस्व गाजवत ३५० गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. अत्यंत मानाच्या आणि महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या क्रीडा महोत्सवात मुंबई विद्यापीठानं सलग तीन वेळा अजिंक्यपद पटकावण्याचा बहुमान मिळवला आहे.

१४ ते १८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान मुंबई विद्यापीठात २२ व्या क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. पाच दिवसांच्या या क्रीडा महोत्सवात कबड्डी (पुरुष व महिला), खो-खो (पुरुष व महिला), व्हॉलीबॉल (पुरुष व महिला), बास्केटबॉल (पुरुष व महिला), मार्ग व मैदानी स्पर्धा (पुरुष व महिला) या एकूण पाच खेळ प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान १८ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या पारितोषिक वितरण सभारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर उपस्थित होते. पार पडलेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये मुंबई विद्यापीठानं घवघवीत यश संपादन केलं आहे.



मुंबई विद्यापीठाची कामगिरी


  • अॅथलेटिक (पुरुष )- तृतीय स्थान
  • अॅथलेटिक (महिला) - तृतीय स्थान
  • बास्केट बॉल (पुरुष) – प्रथम स्थान
  • बास्केट बॉल (महिला) – प्रथम स्थान
  • कबड्डी (पुरुष) – द्वितीय स्थान
  • कबड्डी (महिला) –प्रथम स्थान
  • खो-खो (पुरुष) – प्रथम स्थान
  • खो-खो (महिला) – प्रथम स्थान
  • व्हॉलीबॉल (पुरुष)- प्रथम स्थान
  • व्हॉलीबॉल (महिला)- चतुर्थ स्थान



३५० गुणांची कमाई

जनरल चॅम्पिअनशिप टीम इव्हेन्ट रोटेटिंग ट्रॉफी पुरुष गटातून १९० गुणांसह आणि महिला गटातून १६० गुणांसह मुंबई विद्यापीठानं एकूण ३५० गुणांची कमाई केली आहे. या गुणांमुळे मुंबई विद्यापीठानं ओव्हरऑल चॅम्पिअनशिप ट्रॉफी पटकवण्याचा मान मिळवला आहे. महिला गटातून कबड्डीसाठी उत्कृष्ट खेळाडू म्हणून मेघा कदम, खो-खो पुरुष गटातून निखिल वाघेला, खो-खो महिला गटातून रुपाली बढे, बास्केटबॉल पुरुष गटातून विनायक गुंड, बास्केटबॉल महिला गटातून कॅरीना मॅनेझेस, व्हॉलीबॉल पुरुष गटातून आशुतोष भोर या विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून बहुमान पटकावला.


सर्व विजेत्या खेळाडूंना पुढील भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा. खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व महाविद्यालयं आणि विद्यापीठांनी प्रोत्साहन द्यावं, त्यांच्यासाठी लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा तयार कराव्यात, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय स्तरावर सर्वोतोपरी मदत केली जात आहे. मुंबई विद्यापीठात खेळांसाठी उत्तम सुविधा आहेत, मात्र या क्षेत्रातील वाढती गरज लक्षात घेता विद्यापीठानं अधिक सक्षमपणे या बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच येत्या काळात मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात खेळासाठी सर्व उद्ययावत सुविधा तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.

- रवींद्र वायकर, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री



हेही वाचा -

मौनी रॉयचे डिफरंट डाएट्स!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा