Advertisement

मुंबई विद्यापीठाचा इथंही हलगर्जीपणा, निम्म्या इमारतींना ओसीच नाही


मुंबई विद्यापीठाचा इथंही हलगर्जीपणा, निम्म्या इमारतींना ओसीच नाही
SHARES

परीक्षा निकालाच्या गोंधळामुळे वादग्रस्त ठरलेलं मुंबई विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. यामागचं कारण म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या कालिना परिसरातील ६१ पैकी ३६ इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसल्याचं उघडकीस आलं आहे. या इमारती १९७५ ते २००८ दरम्यान बांधण्यात आलेल्या आहेत.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महापालिकेकडे मुंबई विद्यापीठाच्या कालिना परिसरातील इमारतींना दिलेल्या सीसी, आयओडी, ओसीची माहिती मागितली होती. उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव) विशेष कक्षाने अनिल गलगली यांना दिलेल्या माहितीनुसार, सांताकूझ पूर्व, कोले-कल्याण व्हिलेज, सीटीएस नंबर ४०९४ येथील जमिनीवर मुंबई विद्यापीठाने बांधलेल्या बहुतांश इमारतींना 'ओसी' नसल्याचं स्पष्ट केलं.



'या' इमारतींनाच 'ओसी'

मुंबई विद्यापीठाने अनिल गलगली यांना दिलेल्या माहितीनुसार एकूण ६१ इमारतींपैकी फक्त २४ इमारतींना ओसी मिळाली आहे. तर ३६ इमारतींना अद्याप 'ओसी' मिळालेली नाही. एका इमारतीला 'पार्ट ओसी' आहे. 'ओसी' मिळालेल्या इमारतींमध्ये रानडे भवन, टिळक भवन, वर्क शॉप, डब्ल्यूआरआयसी गेस्ट हाऊस, एसपी लेडीज हॉस्टेल, न्यू क्लास क्वार्ट्स, महात्मा फुले भवन, ज्ञानेश्वर भवन, यूरसिसन अभ्यास स्टाफ क्वार्टर, ए, बी, सी, डी, ई, एफ, सीडी देशमुख भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, प्रेस गोडाऊन, अबुल कलाम बिल्डिंग, फिरोजशहा मेहता भवन, अण्णा भाऊ साठे भवन, पक्षी भवन, ग्लास भवन, कुलगुरु बंगला या इमारतीचा समावेश आहे. तर कल्चरल सेंटरला पार्टली ओसी आहे.




या इमारतींना 'ओसी'ची प्रतिक्षा

'ओसी' नसलेल्या इमारतींमध्ये आयसीएसएसआर हॉस्टेल, रिडरर्स क्वार्ट्स 12 ए, 12 बी, 12 सी, विद्यार्थी कॅन्टीन, ओल्ड लेक्चर हॉल कॉम्प्लॅक्स, जेएन लायब्ररी, जेपी नाईक भवन, WRIC प्रशासकीय इमारत, आरोग्य केंद्र, कर्मवीर भाऊराव पाटील बॉयज हॉस्टेल, एमडीके लेडीज हॉस्टेल, गरवारे इन्स्टिट्यूट ओल्ड, न्यू गरवारे इन्स्टिट्यूट, वर्क शॉप गरवारे, स्टाफ क्वार्ट्स G, पंडिता रमाबाई लेडीज हॉस्टेल, अलकेश दिनेश मोदी गॅलरी, मराठी भवन, आयडॉल इमारत, झंडू इन्स्टिट्यूट, अनेक्स बिल्डिंग, लाईफ सायन्स बिल्डिंग, एक्झाम कॅन्टीन, शिक्षक भवन, पोस्ट ऑफिस, सर्व्हट क्वार्ट्स, न्यू लेक्चर कॉम्प्लेक्स, संस्कृत भवन, भाषा भवन, राजीव गांधी सेंटर, आयटी पार्क, शंकरराव चव्हाण टीचर्स ट्रेनिंग अकादमी, यूएमडीएई हॉस्टेल, यूएमडीएई फॅकल्टी बिल्डिंग, नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्निकल सेंटर या इमारतीचा समावेश नाही.


चौकशीची मागणी

अनिल गलगली यांच्या मते कालिना परिसरातील ज्या इमारतींना ओसी नाही, त्यात मुंबई विद्यापीठ आणि वास्तुविशारद यांची चूक असून या बाबीची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

ओसी नसलेल्या इमारतीमध्ये दररोज हजारो विद्यार्थी, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची ये-जा असते. मंजूर आराखड्याप्रमाणे या इमारतींचं काम झाले नसून एफएसआय उपलब्ध असल्यामुळे सुधारित आराखडा सादर करण्याची आवश्यकता असल्याचं मत गलगली यांनी व्यक्त केलं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा